बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा, आयुक्तांचे आदेश : वैद्यकीय अधिकारी वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:10 AM2017-10-12T02:10:54+5:302017-10-12T02:11:11+5:30

शहरातील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाºया डॉ. राजा रिजवानी यांना आयुक्तांनी धारेवर धरत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. बोगस डॉक्टरांवरील कारवाईसाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे.

 File bogus doctors, order the Commissioner: Medical officer dispute | बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा, आयुक्तांचे आदेश : वैद्यकीय अधिकारी वादात

बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा, आयुक्तांचे आदेश : वैद्यकीय अधिकारी वादात

Next

उल्हासनगर : शहरातील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाºया डॉ. राजा रिजवानी यांना आयुक्तांनी धारेवर धरत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. बोगस डॉक्टरांवरील कारवाईसाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे.
कॅम्प १ परिसरातील १६ वर्षांच्या सिमरन शर्मा हिचा २५ आॅगस्टला तापाने मृत्यू झाल्याच्या प्रकाराने बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे पडले. तिच्या आईवडिलांसह नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी पालिकेकडे करून पोलीस ठाण्यात कारवाईसाठी निवेदन दिले. समाजसेवक शिवाजी रगडे, नगरसेवक गजानन शेळके आदींनी हा पालिका प्रशासनाकडे लावून धरल्यावर खºया अर्थाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू झाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवानी यांनी आठ बोगस डॉक्टरांची नावे पोलीस ठाण्याला देऊनही गुन्हे दाखल झालेले नसल्याने संशय वाढला होता. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकार परिषद सुरू असताना डॉ. रिजवानी यांना बोलवून बोगस डॉक्टरांवर कारवाई का नाही, असा प्रश्न केला. नुसती पोलिसांना नावांची यादी देऊ नका. स्वत: फिर्याद दाखल करा, अशी सूचना केली. बुधवारी बोगस डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे डॉ. रिजवानी म्हणाले.

Web Title:  File bogus doctors, order the Commissioner: Medical officer dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.