दीड हजार इमारती बेकायदा असल्याच्या संशयाने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:26 AM2018-06-19T03:26:33+5:302018-06-19T03:26:33+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी २७ गावांतील एक हजार ५०० कथित बेकायदा इमारतींना नोटिसा बजावल्या असून, त्या बांधणा-या बिल्डरांना सुनावणीस हजर राहावे, लागणार आहे.

Fear of suspicion that half a thousand buildings are illegal | दीड हजार इमारती बेकायदा असल्याच्या संशयाने घबराट

दीड हजार इमारती बेकायदा असल्याच्या संशयाने घबराट

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी २७ गावांतील एक हजार ५०० कथित बेकायदा इमारतींना नोटिसा बजावल्या असून, त्या बांधणा-या बिल्डरांना सुनावणीस हजर राहावे, लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटिसा बजावण्यात आल्या असल्या, तरी बेकायदा इमारतीविरोधातील कारवाई मात्र शून्य आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना १३ जून रोजी बेकायदा बांधकामप्रकरणी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. घरत हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. घरत यांच्या अटकेनंतर महापालिकेत बेकायदा बांधकाम विभागाकडून कारवाई न करण्याच्या बदल्यात लाच घेतली जात असल्याचे उघड झाले.
महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामे राजरोस सुरू आहेत. मांडा-टिटवाळा, जुनी डोंबिवली, कोपर आदी परिसरात बेकायदा चाळींचा सुकाळ आहे. इतकेच नव्हे तर सीआरझेडच्या जागेतील बेकायदा बांधकामे थाटली आहेत. जून २०१५ मध्ये महापालिकेत २७ गावे आली. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी जाहीर प्रकटन दिले होते. २७ गावांत ८० हजार बेकायदा बांधकामे आहेत. ही बांधकामे गावे महापालिकेत नसताना झाली असली, तरी त्यानंतरही २७ गावांच्या हद्दीत बेकायदा बांधकामे थाटली जात आहे. तळ अधिक चार ते आठ मजल्यांच्या बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहे. या इमारतींना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने परवानगी दिलेली नाही. ग्रामपंचायतीने परवानग्या दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतीचे खोटे सही-शिक्के वापरून बेकायदा इमारती थाटलेल्या आहेत. या बेकायदा इमारतींविरोधात कारवाई करण्यासाठी प्रभाग अधिकाºयांनी जवळपास एक हजार पाचशेपेक्षा जास्त बेकायदा इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. त्याठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्याच्या अधिकृत तपासणीसाठी सुनावणीस हजर राहावे, असे नोटीसधारकांना बजावले आहे. नोटीस मिळाल्यावर सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवावे, असे सूचित केले आहे. मात्र, या प्रकारच्या नोटीस मिळूनही बांधकामधारकांची बांधकामे सुरूच आहेत.
>ही कागदपत्रे आवश्यक
जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे, जमिनीचा मोजणी नकाशा, बिनशेतीपरवाना, महापालिकेने बांधकाम परवानगी दिली असल्यास त्याची प्रत, परवानगीनुसार बांधकाम नकाशाची प्रत या गोष्टी सादर करणे अपेक्षित आहे.

Web Title: Fear of suspicion that half a thousand buildings are illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण