भाईंदरमध्ये कृषिमंत्री सदाभाऊंच्या हस्ते शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ,  महापौरांसह, आमदार, पालिका अधिकाऱ्यांची कार्यक्रमाला दांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 06:13 PM2017-11-19T18:13:26+5:302017-11-19T18:14:29+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने सुरु केलेल्या संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.

Farmer Weekly launches at the hands of Agriculture Minister Sadabhau, in Bhaindar, Mayor, MLAs, municipal officers' program | भाईंदरमध्ये कृषिमंत्री सदाभाऊंच्या हस्ते शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ,  महापौरांसह, आमदार, पालिका अधिकाऱ्यांची कार्यक्रमाला दांडी

भाईंदरमध्ये कृषिमंत्री सदाभाऊंच्या हस्ते शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ,  महापौरांसह, आमदार, पालिका अधिकाऱ्यांची कार्यक्रमाला दांडी

googlenewsNext

 भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने सुरु केलेल्या संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. मात्र यावेळी माजी महापौर गीता जैन यांच्याखेरीज महापौरांसह, आमदार, नगरसेवक व एकही पालिका अधिकारी उपस्थित नसल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. मात्र काही पालिका कर्मचाय््राांनी उपस्थिती दाखविली होती.  राज्य सरकारच्या सुचनेप्रमाणे पालिकेने वर्षभरापुर्वी संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी मंडळाला शेतीमाल विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळच्या महासभेत तसा ठरावही मंजुर करुन तो राज्याच्या पणन विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला. परंतु, त्या मंडळाची पणन विभागाकडे नोंदच नसल्याने विभागाने सुरुवातीला त्याला अमान्य केले. मंडळाने नोंदणी केल्यानंतर विभागाने त्याला मान्यता दिली. त्यामुळे मंडळाचा शेतकरी आठवडा बाजर सुरु करण्याचा मार्ग सुकर झाला. यानंतर पालिकेने या मंडळाला मीरारोडच्या रामदेव पार्क परिसरातील पालिकेच्या नियोजित मीनाताई ठाकरे मंडईच्या मोकळ्या जागेसह भार्इंदर पश्चिमेकडील पालिकेचे स्थानिक संस्था कर विभागाचे मुख्य कार्यालयात मोफत जागा उपलब्ध करुन दिली. त्याचा शुभारंभ कृषीमंत्र्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. त्याची मोजकीच निमंत्रण पत्रिका छापण्यात आली असली तरी त्याला मात्र व्यापक प्रसिद्धी देण्याचे प्रशासनाकडुन टाळण्यात आल्याचा आरोप नागरीकांकडुन करण्यात आला. मीरारोड येथील बाजारापासुन कृषीमंत्र्यांनी महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ, पुणे, अन्नपुर्णा कृषी उत्पन्न खरेदी-विक्री व उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आठवडे बाजाराला सुरुवात केली. त्यावेळी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका गीता जैन यांच्याखेरीज एकही लोकप्रतिनिधी व पालिका अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली असली तरी शेतकय््राांप्रती अनास्था दाखविणाय््राांकडे दुर्लक्ष करुन कृषीमंत्र्यांनी पालिकेने शेतकय््राांसाठी अधिकाधिक जागा उपलब्ध करुन दिल्यास आठवड्यातुन किमान दोन दिवस बाजार सुरु केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शहरातील बचतगटांचाही त्यात समावेश करुन त्यांना पाकीटबंद पदार्थांची विक्री करता येऊ शकत असल्याची सुचना केली. यामुळे बचतगटांना आर्थिक फायदा होणार असल्याने त्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी गीता जैन यांना दिले. जैन यांनी केलेल्या भाषणात महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थ केवळ बाजारात न विकता ते घरोघरी विकल्यास त्यांना फायदा होईलच. परंतु, ग्राहकांना घरपोच वस्तु मिळाल्यास त्यांची बाजारातील पायपीट वाचणार असुन अशा बचतगटांना सरकारच्या माध्यमातुन पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषीमंत्र्यांकडे केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिलिप बाबड यांच्यासह ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, पणन अधिकारी उपस्थित होते. 

            सुरु करण्यात आलेला आठवडे बाजार केवळ रविवारीच भरविण्यात येणार असुन मीरारोड येथील बाजार सकाळी ७ ते दुपारी १ तर भार्इंदर पश्चिमेकडील बाजारदुपारी ३ ते रात्री ८ वाजेदरम्यान सुरु राहणार आहे. या कार्यक्रमाला वैयक्तिक कारणास्तव अनुपस्थित राहणार असल्याचा एसएमएस पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी कृषीमंत्र्यांना केल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्यांच्या अनुपस्थितीत पालिकेतील एखाद्या वरीष्ठ अधिकाऱ्याने कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित असल्याची मत जैन यांनी व्यक्त केले.

Web Title: Farmer Weekly launches at the hands of Agriculture Minister Sadabhau, in Bhaindar, Mayor, MLAs, municipal officers' program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.