फेसबुकवरील मैत्री महिलेला पडली महागात; १९ लाखांचा घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:05 AM2018-11-28T00:05:07+5:302018-11-28T00:05:20+5:30

फेसबुकवर झालेली मैत्री वसईतील एका गृहिणीला चांगलीच महागात पडली.

Facebook's friendship with the woman robs 19 lakhs of money | फेसबुकवरील मैत्री महिलेला पडली महागात; १९ लाखांचा घातला गंडा

फेसबुकवरील मैत्री महिलेला पडली महागात; १९ लाखांचा घातला गंडा

Next

ठाणे : फेसबुकवर झालेली मैत्री वसईतील एका गृहिणीला चांगलीच महागात पडली. या मैत्रीतून विविध भेटवस्तू पाठवल्याचा बहाणा करून दोघांनी त्यांना १९ लाख १५ हजारांचा गंडा घातला. याबाबत ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्तांकडे केलेल्या अर्जानुसार,या प्रकरणाची चौकशी ठाणे खंडणी विरोधी पथकामार्फत केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.


वसईतील ४२ वर्षीय तक्रारदार महिला या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत डिसेंबर २०१७ ते जुलै २०१८ दरम्यान नोकरी करत होत्या. याचदरम्यान,त्यांनी स्वत:चा आयात-नियात व्यापार सुरू करण्याचे ठरवले. त्यातून त्यांनी फेसबुक,इन्स्टाग्राम आणि टिष्ट्वटर यावर त्यांच्या ओळखीच्या विदेशी कंपन्यांमधील विविध पदाधिकाऱ्यांचा शोध सुरू केला होता.याचवेळी इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख जो डेरीक याच्याशी झाली. त्याने कॉलॉफोर्नियात ज्युस व वाइनचा मोठा बिजनेस असल्याचे भासवले. आपली अनेक मोठ्या ब्रँडच्या कंपनी मालकांशी मैत्री असून मी तुमच्या व्यवसायात मदत करू शकतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

२७ आॅगस्ट २०१८ रोजी त्याने त्यांना फेसबुक मसेंजरवर एक मेसेज पाठवला. त्यावेळी त्याने आपल्या कंपनीला एक वर्ष पूर्ण होते. त्यानिमित्त त्यांची कंपनी विविध भेटवस्तू वाटप करत असून त्या तुम्हालादेखील पाठवणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा पत्ता द्या, असे सांगून त्यांच्याकडून मोबाईल क्र मांक व घराचा पत्ता घेतला. त्यानंतर त्याने त्याचदिवशी लेदर बॅग, पर्स,मनगटी घड्याळ,चेन लॉकेटस्,लॅपटॉप व इतर काही वस्तू कुरिअर केल्या. २८ आॅगस्ट रोजी त्याने त्यांना मोबाइल क्रमांकावर सुमीतकुमार नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने सीमा शुल्क विभाग, दिल्ली येथील सहायक आयुक्त असल्याचे सांगितले. तसेच त्याने त्यांना परदेशातून दिल्ली येथे कुरिअर आल्याचे सांगून त्यावर ६८ हजारांचा कर भरावा लागेल असे सांगितले. तो न भरल्यास कायदेशीर कारवाईसह अटकेची भीती दाखवली.

अटकेची दाखवली भीती
सुमीतकुमार याने दिलेल्या बँकेच्या खात्यात पैसे भरले. त्यानंतर त्याने त्या भेटवस्तूंमध्ये एक किलो सोने मिळाले सांगून कर भरावा लागेल, असे सांगितले. अटकेची भीती दाखवून एकूण १९ लाख १५ हजारांची फसवणूक केली.

Web Title: Facebook's friendship with the woman robs 19 lakhs of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.