मोहिमेवर साडेतीन कोटींचा खर्च, दुहेरी लेनचा नवीन पूल बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:00 AM2018-11-19T04:00:29+5:302018-11-19T04:01:27+5:30

पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले.

the expedition on three and a half million, the new lane will be built for the new bridge | मोहिमेवर साडेतीन कोटींचा खर्च, दुहेरी लेनचा नवीन पूल बांधणार

मोहिमेवर साडेतीन कोटींचा खर्च, दुहेरी लेनचा नवीन पूल बांधणार

googlenewsNext

- प्रशांत माने

कल्याण : पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले. पत्रीपुलाच्या या पाडकामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च झाले.
कमीतकमी वेळेत पूल पाडण्याचे आमचे उद्दिष्ट होते, जेणेकरून मेगाब्लॉकचा रस्ते वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये. अनेक लोकल, मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन क्रेनच्या साहाय्याने हे काम करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक एस.के. तिवारी यांनी दिली. या मोहिमेसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला. जुना पूल धोकादायक झाल्याचे तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. हा पूल दुरु स्त करून वापरावा, अशा स्थितीतही नव्हता. त्यामुळे पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएसआरडीसी आता याठिकाणी नवीन पूल बांधणार असून तो दोन लेनचा असणार आहे. त्याला रेल्वेने मंजुरी दिली असून बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती तिवारी यांनी दिली. या मोहिमेत एस.के. अग्रवाल, आर.के. गोयल, राजीव मिश्रा, डॉ. ए.के. सिंग यांच्यासह ३०० कर्मचारी आणि ५० अभियंत्यांचे विशेष योगदान मिळाल्याचे तिवारी यांनी सांगितले.

अखेर पूल पाडण्यात आला
अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर रेल्वेच्या सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. २० जुलैला केलेल्या तपासणीत पत्रीपूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे आधी अवजड वाहतुकीसाठी आणि २२ आॅगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आला.
मुंब्रा बायपासचे काम पूर्ण झाल्याने २५ सप्टेंबर रोजी पत्री पुलावरचा डांबरी रस्ता उखडण्यात आला. हा पूल अडीच महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अखेर, रविवारी हा पूल पाडण्याचे काम करण्यात आले.
दरम्यान, केडीएमसीचा नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर २००४ सालीच जुना पूल पाडण्यात येणार होता; पण त्याला तब्बल १४ वर्षे विलंब लागला, अशीही माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.

रेल्वेने नोंदवला विक्रम
रेल्वेचे दुरुस्तीकाम असो, अथवा पूल उभारणीची कामे, यासाठी १० ते १२ तासांचे ब्लॉक घेतले जात असताना पत्रीपुलाच्या पाडकामासाठी रेल्वेने केवळ सहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. प्रत्यक्षात, त्याआधीच पुलाचे पाडकाम करण्यात आले. मेगाब्लॉकची वेळ संपण्यापूर्वी तब्बल ५५ मिनिटे आधी लोकलसेवा सुरू करून रेल्वेने एक प्रकारे विक्रमच नोंदवला आहे.

कोंडी सुटण्यासाठी लवकरच पुलांची निर्मिती
कल्याण-डोंबिवलीला सद्य:स्थितीत भेडसावणारी वाहतूककोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी नव्याने बांधल्या जाणाऱ्या पत्रीपुलासह पलावा येथेही पूल बांधला जाणार आहे. एमएसआरडीसी या पुलांचे बांधकाम करणार आहे. जुन्या पत्रीपुलाच्या ठिकाणी लवकरच नवीन पूल बांधायला घेतला जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
खा. शिंदे यांच्यासह माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, गटनेते दशरथ घाडीगावकर, रमेश जाधव आदींनी पुलाच्या पाडकामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शिंदे बोलत होते. कल्याण-शीळचे सहापदरीमार्गाचे कामदेखील लवकरच सुरू होईल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा मिळेल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.

Web Title: the expedition on three and a half million, the new lane will be built for the new bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण