डोंबिवलीत अनोखे कॉफी पेंटिंग प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 07:13 PM2018-02-14T19:13:19+5:302018-02-14T19:13:42+5:30

सर्वसामान्य नजरेला जे टिपता येत नाही ते कलाकारांना दिसतं त्यातूनच कला जन्माला येत असते असं नेहमीच म्हटले जाते. अशाच एका मनस्वी कलाकाराने कॉफी पेंटिंग या अतिशय अनोख्या कलाविष्काराचा ध्यास घेतला आहे.

Exotic coffee painting display in Dombivli | डोंबिवलीत अनोखे कॉफी पेंटिंग प्रदर्शन

डोंबिवलीत अनोखे कॉफी पेंटिंग प्रदर्शन

Next

डोंबिवली -  सर्वसामान्य नजरेला जे टिपता येत नाही ते कलाकारांना दिसतं त्यातूनच कला जन्माला येत असते असं नेहमीच म्हटले जाते. अशाच एका मनस्वी कलाकाराने कॉफी पेंटिंग या अतिशय अनोख्या कलाविष्काराचा ध्यास घेतला आहे. डोंबिवलीच्या बाल भवन येथे कॉफी हे माध्यम वापरून रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन १७ व १८ फेब्रुवारी दरम्यान बालभवन येथे भरवण्यात आले आहे. 

डोंबिवलीच्या निकिता देशमुख यांनी चित्रकलेची साधना करताना माध्यम म्हणून रंगांच्या ऐवजी कॉफीची चित्र रेखाटली आणि त्यातूनच कॉफी पेंटिंग्ज कॅनव्हासवर उतरली. चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यावर कलाप्रांतात आपले स्वतःचे असे विशिष्ट स्थान कसे निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल याची जाणीव झाली. मग एक एक प्रयोग करत असताना उत्सुकता म्हणून कॉफी हेच रंगाचे माध्यम म्हणून वापरण्याची कल्पना सुचली. 

लँड स्केप डिझाइन शिकत असताना रंग, रूप, आकार यांची ओळख झाली आणि हेच क्षेत्र आपल्यासाठी योग्य असल्याचे जाणवले. पण नेहेमीच्या तैलचित्र किंवा अकरॅलीक रंग वापरण्याऐवजी काहीतरी वेगळं माध्यम निवडावं असं मनात आलं. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता एक गती घेताना दिसत आहे. डोंबिवलीत पहिल्यांदा कॉफी पेंटिंग्जचं प्रदर्शन भरवणार असून आतापर्यंत मुंबई, पुणे व अन्य शहरात मिळून १३ प्रदर्शनं झाली असून १०० पेक्षा अधिक कॉफी पेंटिंग्ज केली आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व डोंबिवलीचे आमदार श्री रविंद्र चव्हाण व ओमकार एज्युकेशनल ट्रस्टच्या विश्वस्त दर्शना सामंत,  उपस्थितीत शनिवार दि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचा प्रारंभ बालभवन येथे होणार आहे.

Web Title: Exotic coffee painting display in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.