अगदी स्वस्तात बायको खुश, फक्त 10 रुपयांत करा साडीची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 09:12 PM2019-06-07T21:12:25+5:302019-06-07T21:13:48+5:30

पावसाळा सुरू होणार म्हटलं की बाजारात सेल आणि बंपर ऑफरचा धमाका दिसून येतो.

Even the cheapest wife is happy, buy sarri's only in 10 rupees in ulhasnagar | अगदी स्वस्तात बायको खुश, फक्त 10 रुपयांत करा साडीची खरेदी

अगदी स्वस्तात बायको खुश, फक्त 10 रुपयांत करा साडीची खरेदी

googlenewsNext

ठाणे - कपडे खरेदी करायचेत तर मुंबईला चला, स्वस्तात खरेदी होऊन जाईल, असे ग्रामीण भागात नेहमीच ऐकायला मिळते. त्यातच, मुंबईत कुठं ? असा प्रश्न केल्यास उत्तर येत, आरे उल्हासनगरला.ठाणे जिल्ह्यातील उल्हास नगर हे स्वस्त कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर, महिलांच्या साड्यांसाठी गुजरातचे सुरत लोकप्रिय आहे. मात्र, उल्हासनगरमधील एका व्यापाऱ्याने बंपर सेल सुरू केला आहे. या सेलमुळे तुम्ही अगदी स्वस्तात तुमच्या पत्नीला खुश करु शकता. 

पावसाळा सुरू होणार म्हटलं की बाजारात सेल आणि बंपर ऑफरचा धमाका दिसून येतो. गावापासून ते महानगरांतील पॉश मॉलमध्येही ऑफर्स आणि सेलच्या जाहिराती झळकतात. उल्हासनगरमधील एका दुकानात चक्क 10 रुपयांत साडीची विक्री होत आहे. उल्हासनगर कॅम्प 2 मधील रंग क्रिएशन या दुकानात फक्त दहा रुपयाला साडीची विक्री होत असून महिलांनी येथे मोठी गर्दी केली आहे. उल्हासनगरमध्ये लातूरकर बालाजी साखरे उर्फ अश्विन यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही लूट ऑफर सुरू केली आहे. या ऑफरची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा असून पत्नीला स्वस्तात खुश करण्याची मोठी संधी नवरोबांना आहे. तर लग्नाचा बस्ता किंवा अहेरासाठी साडी खरेदी करायची असल्यासही या ऑफरला लाभ ग्राहकांना घेता येऊ शकतो.  

10 रुपयांत साडी हि सुविधा फक्त सकाळी साडे 10 ते 12 वाजेपर्यत सुरू असते. प्रत्येक जून महिन्यात आम्ही अशाप्रकारे आमच्या ग्राहकांची सेवा करणार आहोत. उरलेले 11 महिने व्यवसाय केला जातो, त्याची परतफेड म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे दुकानात नवीन ग्राहक येतात, असे दुकानाचे मालक अश्विन यांनी म्हटले आहे. दरम्यान, 5 जूनपासून साड्यांचा ही ऑफर सुरू झाली असून एवढा महिनाभर ग्राहकांना स्वस्ताच साडी खरेदी करता येईल. 
 

Web Title: Even the cheapest wife is happy, buy sarri's only in 10 rupees in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.