मुंब्रा-शीळच्या ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:32 AM2018-03-24T03:32:54+5:302018-03-24T03:32:54+5:30

महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे-३ या विभागातील मुंब्रा-शीळ या भागात महावितरणने धडक कारवाई करून मागील आठ महिन्यांत १३६४ वीजचोºया पकडून एक कोटी ९५ लाख रुपये वसूल केले आहेत.

Electricity supply of 57 thousand customers of Mumbra-Sheel has been discontinued | मुंब्रा-शीळच्या ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

मुंब्रा-शीळच्या ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Next

ठाणे : महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे-३ या विभागातील मुंब्रा-शीळ या भागात महावितरणने धडक कारवाई करून मागील आठ महिन्यांत १३६४ वीजचोºया पकडून एक कोटी ९५ लाख रुपये वसूल केले आहेत. विशेष म्हणजे महावितरणने मुंब्रा, शीळ भागात तब्बल ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ग्राहकांकडे मुद्दल आणि व्याजासह ३०० कोटींची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली.
महावितरणने आॅगस्ट २०१७ पासून पकडलेल्या १३६४ केसेसमध्ये एकूण १९ हजार ५११ इतक्या युनिटची वीज चोरी केल्याचे उघड झाले. त्याचे मूल्य सुमारे एक कोटी ९५ लाख इतके होते. यापैकी ६५० वीजचोरांनी सुमारे एक कोटी सात लाख रु पयांचा भरणा केला आहे. यामध्ये ६५० पैकी ४९० ग्राहकांनी नियमानुसार तडजोड करून सुमारे १८ लाखांची दंडाची रक्कम महावितरणकडे भरणा केली आहे. तर, उर्वरित ग्राहकांकडे महावितरणचे अधिकारी पाठपुरावा करत असून त्यांनी दंडासह रक्कम न भरल्यास त्यांच्यावर रीतसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
अभय योजनेस अत्यंत अल्प प्रतिसाद
महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी वेळोवेळी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.
परंतु, मुंब्रा व शीळ या भागांतून अशा योजनांना नेहमीच अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सध्या या भागात सुमारे ५७ हजार इतक्या ग्राहकांची वीज कायमस्वरूपी खंडित केली असून त्यांच्याकडे २५० कोटी मुद्दल व ५० कोटी व्याज अशी एकूण सुमारे ३०० कोटी इतकी थकबाकी आहे. असे असले तरी सध्या सुरू असलेल्या अभय योजनेंतर्गत ठाणे-३ विभागात नव्याने रु जू झालेल्या टीमने सुमारे दोन हजार ग्राहकांकडून सुमारे दोन कोटी वसूल केले आहेत.

भूलथापांना बळी न
पडता ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
महावितरणने चालू व थकीत वीजबिल वसुलीकरिता तसेच नवीन जोडणी व अन्य सुविधांकरिता कोणत्याही एजंटची नेमणूक केली नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा एजंटच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.

कर्मचाºयांना मारहाण
वीजबिलवसुली व इतर दैनंदिन कामे करताना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण होण्याच्या घटना मुंब्रा व शीळ या भागांत मोठ्या प्रमाणात होतात. मागील आठ महिन्यांत कर्मचाºयांना मारहाणीच्या एकूण सहा घटना घडल्या आहेत. यातील सर्व दोषी ग्राहकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Electricity supply of 57 thousand customers of Mumbra-Sheel has been discontinued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे