शिक्षण संस्था हे कमाईचे साधन नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:00am

सध्या शिक्षण क्षेत्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या क्षेत्राकडे कमाईचे साधन म्हणून पाहिले जाते, ही आपली संस्कृती नाही. शिक्षण महर्षींनी डोक्यावर टाईपराईटर घेऊन शिक्षण संस्था काढल्या.

कल्याण : सध्या शिक्षण क्षेत्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या क्षेत्राकडे कमाईचे साधन म्हणून पाहिले जाते, ही आपली संस्कृती नाही. शिक्षण महर्षींनी डोक्यावर टाईपराईटर घेऊन शिक्षण संस्था काढल्या. याचा विसर आजच्या तथाकथीत शिक्षणसम्राटांना पडल्याची खंत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. यावेळी महाजन भावूक झाल्या. त्यांच्या डोळ््यात अश्रू तरळले. ‘याज्ञवल्क्य’ संस्थेच्या वतीने याज्ञवल्क्य पुरस्काराचे वितरण नूतन विद्यामंदिरात महाजन यांच्या हस्ते झाले. तेव्हा त्यांनी ही खंत व्यक्त केली. बदलापुरातील ग्रंथसखा वाचनालयाचे शामसुंदर जोशी आणि प्रा. स्मिता कापसे यांना हा पुर्कार देण्यात आला. २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरुप होते. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण पाठक, राजीव जोशी, मिल्ािंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याणचा भारदस्तपणा रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांनी टिकवून ठेवला. रामभाऊ कापसे मला गुरुतुल्य होते. त्यांची मी विद्यार्थिनी. त्यांच्या पत्नीही त्याच तोडीच्या असल्याने त्यांचे संशोधन मौल्यवान आहे. माझ्या हस्ते गुरुपत्नीचा सत्कार झाला. त्यामुळे मी धन्य झाले, अशा भावना व्यक्त करून महाजन म्हणाल्या, पुरस्कार देणारी संस्था ही याज्ञवल्क्य असल्याने तिला वेदाचे अधिष्ठान आहे. अनेक वर्षापासून ही संस्था सामाजिक कार्य करीत आहे. तुटपुंज्या खर्चात व वर्गणीवर संस्था चालविणे कठीण असते. त्याचा वस्तुपाठ मराठी संस्थांकडून इतरांनी घेतला पाहिजे, असे आवाहन महाजन यांनी केले. गं्रथप्रसाराचे काम करणारे जोशी यांच्या कार्याचा गौरव करताना त्या म्हणाल्या, ग्रंथालयात वाचकांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती असावी. ती ग्रंथालयात आलेल्यांना व्यक्तीला काय वाचले पाहिजे, कोणत्या पुस्तकांनंतर काय वाचावे हे सांगेल. ‘ग्रंथ सखा’ असलेल्या जोशी यांना पाहिल्यावर महाराष्ट्राचे भवितव्य खरोखरच उज्ज्वल आहे, याबद्दल महाजन यांनी विश्वास व्यक्त केला. पळून जाणारी मुलगी मी काम करुन शिक्षण घेत असल्याने रामभाऊच्या वर्गात माझी अनेकदा गैरहजेरी असे. त्यामुळे रामभाऊ मला गंमतीने पळून जाणारी मुलगी असे म्हणत, अशी आठवणही महाजन यांनी मिश्किलपणे सांगितली. रामभाऊंच्या पत्नी स्मिता या त्यांच्या छायाज्योती नसून स्वयंप्रकाशाने तेवणाºया दीपज्योती आहेत, असे गौरवोद्गार महाजन यांनी काढले. ‘आनंदीबाई जोशी यांच्यावर टपाल तिकीट काढा’ पहिल्या महिला डॉक्टर असा बहुमान मिळविणाºया डॉ. आनंदीबाई जोशी या कल्याणच्या होत्या. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्र सरकारने आनंदीबाई जोशी यांचे टपाल तिकीट काढावे, अशी मागणी भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी महाजन यांच्याकडे केली.

संबंधित

कोल्हापुरात अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त, दोघांना अटक 
गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? अशोक चव्हाण यांचा संतप्त सवाल
अमरावती विद्यापीठाच्या पहिल्याच ‘डी. लिट’ला ग्रहण, मीनल ठाकरे यांची कुलपतींंकडे तक्रार
कोरेगाव-भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेंना दिलासा, 14 मार्चला होणार पुढील सुनावणी
जीममध्ये न जाता सतीश कौशिक यांनी घटवलं 25 किलो वजन, असे होते डाएट प्लान

ठाणे कडून आणखी

सभागृहानेच अविश्वास ठराव करुन मला शासनाकडे पाठवावे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे भावनिक आवाहन
ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रंगले मायबोलीचे प्रेमतरंग, प्रेक्षकांची मिळाली भरभरुन दाद
मीरा भार्इंदर - आजच्या महासभेत आरोपांच्या फैरीत सापडलेल्या प्रारूप विकास आराखडयाच्या विषयावर लक्ष
मार्क्सवादी कम्युनिस्टांनी काँगे्रसवरून मतभेद मिटवावे - के. गंगाधरन
पीएनबी घोटाळा; आठ ते दहा कोटींची ठाण्यातील मालमत्ता जप्त, तीन कोटींच्या आसपास हि-याचे दागिने मिळाले

आणखी वाचा