Education Board waiting for the education officers | शिक्षण मंडळ शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत
शिक्षण मंडळ शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत

राजू काळे 

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांची १७ डिसेंबर २०१८ रोजी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी १० दिवसांनंतर एका अधिकाºयाची नियुक्ती केली. मात्र, हा अधिकारी अद्यापही पालिका शिक्षण मंडळात हजर झाला नाही. त्यामुळे पालिकेचे शिक्षण मंडळ अनेक दिवसांपासून शिक्षणाधिकाºयांच्या प्रतीक्षेत आहे.

पूर्वी या पदावर जिल्हा परिषदांच्या अखत्यारितील अधिकाºयांना येथील शिक्षण मंडळात नियुक्त केले जात होते. परंतु, यंदा राज्य सरकारच्या विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई मंडळ यांनी प्रथमच पालिकेच्या शिक्षण मंडळात प्रथम वर्गातील अधिकारी भास्कर बाबर यांची नियुक्ती केली होती. या अधिकाºयांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांपासून बंद झालेल्या शैक्षणिक सहलींना सुरुवात करून शिक्षणाच्या नवीन संकल्पना राबवण्यास गती दिली. या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रशासनासह सत्ताधाºयांमधील पदसिद्ध अधिकाºयांकडे सतत पाठपुरावा करून मंजुरी मिळवली होती. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीचे शिक्षण उपलब्ध झाले. अशा कामांचा सपाटा लावणाºया बाबर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने विभागीय शिक्षण उपसंचालकांनी त्यांना उपसंचालकपदी बढती देत १७ डिसेंबर २०१८ रोजी त्यांची बदली मुंबईत केली. पालिका शिक्षणाधिकाºयांच्या रिक्त झालेल्या पदावर उपसंचालकांनी २७ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईच्या निरंतर शिक्षण कार्यालयातील कार्यक्रम सहायक आर.बी. शिंगाडे यांच्याकडे शिक्षणाधिकाºयांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. परंतु, शिंगाडे हे आजारपणाच्या रजेवर गेल्याने त्यांनी अद्यापही कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे पालिका शिक्षण मंडळ अद्यापही शिक्षणाधिकाºयांच्या प्रतीक्षेत असून दरम्यान या पदाचा अतिरिक्त कार्यभार पालिका मुख्यालयातील समाजविकास अधिकारी दीपाली पोवार यांच्याकडे सोपवला आहे.
मुख्यालयापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या शिक्षण मंडळातील अधिकारी व कर्मचाºयांना महत्त्वाच्या कामासाठी सतत मुख्यालयात येजा करावी लागते. यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात शाळेतील स्वच्छतेचा आढावा घेतानाही मंडळाची धावपळ सुरू आहे. शहरात पालिका शाळांसह एकूण ३७५ शाळा आहेत. त्यांना भेटी देणे, त्यातील शिक्षणासह सुविधांचे सर्वेक्षण करणे, त्याचा आढावा घेऊन अहवाल तयार करण्याची कामे शिक्षणाधिकाºयांअभावी धीम्या गतीने सुरू असल्याने त्वरित शिक्षणाधिकाºयांची नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा शिक्षण मंडळाकडून व्यक्त होऊ लागली आहे.

शिक्षणाधिकाºयांच्या त्वरित नियुक्तीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सतत पाठपुरावा सुरू असून ती बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली जात आहे.
- दीपक पुजारी, उपायुक्त
पुढील आठवड्यात पालिकेला लवकरात लवकर शिक्षणाधिकारी दिला जाईल.
- भास्कर बाबर, विभागीय शिक्षण उपसंचालक
 


Web Title: Education Board waiting for the education officers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.