महानगर गॅसच्या कामामुळे डोंबिवली एमआयडीसीत खड्डे : नागरिकांसह वाहनचालकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:22 PM2018-03-30T15:22:12+5:302018-03-30T15:22:12+5:30

महानगर गॅसतर्फे वर्षभरापासून एमआयडीसीच्या विविध भागांमध्ये काम सुरु आहे. भूमिगत गॅस पाईप लाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी रस्ते खोदले आहेत. मात्र जेथे काम झाली तेथिल रस्ते तातडीने बुजवून पक्का रस्ता न केल्याने वाहनचालकांसह पादचा-यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

Dumps in Dombivli MIDC due to the work of Mahanagar Gas: Disadvantages of Drivers with Citizens | महानगर गॅसच्या कामामुळे डोंबिवली एमआयडीसीत खड्डे : नागरिकांसह वाहनचालकांची गैरसोय

आमदार सुभाष भोईर घालणार लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्दे एमआयडीसीचे दुर्लक्ष झाल्याची डॉ. सुनिता पाटील यांची टिकाआमदार सुभाष भोईर घालणार लक्ष

डोंबिवली: महानगर गॅसतर्फे वर्षभरापासून एमआयडीसीच्या विविध भागांमध्ये काम सुरु आहे. भूमिगत गॅस पाईप लाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी रस्ते खोदले आहेत. मात्र जेथे काम झाली तेथिल रस्ते तातडीने बुजवून पक्का रस्ता न केल्याने वाहनचालकांसह पादचा-यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
त्यासंदर्भात नगरसेविका डॉ.सुनिता पाटील यांनी जानेवारी महिन्यापासून एमआयडीसी अधिका-यांकडे तगादा लावला होता, परंतू तेथिल अधिकारी दाद देत नसून पत्रव्यवहाराला केराची टोपी दाखवत असल्याची टिका डॉ. सुनिता यांनी केली. रस्त्यांची कामे रखडलेली असतांनाच जे आहेत त्यातही खड्डे करण्यात आल्याने नागरिकांचा संताप होतो. त्यांची गैरसोय होते ही वस्तूस्थिती असून पाथर्ली भागात त्यामुळे मोठी अडचण होत आहे. त्याच परिसरात एक शाळा असून त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना देखिल गैरसोयीला सामोरे जावे लागते. आगामी काळात पावसाळा येईल, त्यात असे खड्डे राहीले तर चिखल होईल, आणि गैरसोय आणखी वाढेल असेही त्या म्हणाल्या. यासंदर्भात त्यांनी एमआयडीसी अधिका-यांना जानेवारीत पत्र लिहीले, तसेच बुधवारी प्रत्यक्ष भेट घेतली, पण तरीही अधिकारी दाद लागू देत नसल्याने नगरसेविका त्रस्त आहे. एमआयडीसी हद्दीत काम करण्यासाठी महानगरने काम करण्याआधीच विशेष निधी एमआयडीसीकडे दिलेला असून खड्डे बुजवण्याची चांगला रस्ता करण्याची जबाबदारी ही एमआयडीसीचीच असल्याने ती कामे व्हायलाच हवीत, असे मत शिवसेनेचे कल्याण ग्रामिणचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले. पण एमआयडीसी स्वत:वरची जबाबदारी झटकत असून नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ते योग्य नसून स्थानिक लोकप्रतिनिधींची गैरसोय होणे योग्य नाही, त्यासंदर्भात निश्चित विचारणा केली जाणार असून रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा, पावसाळयात कोणालाही त्रास होऊ नये याची दक्षता घेणार असल्याची माहिती आमदार सुभाष भोईर यांनी दिली. यासंदर्भात एमआयडीसीचे अभियंता संजय ननावरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: Dumps in Dombivli MIDC due to the work of Mahanagar Gas: Disadvantages of Drivers with Citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.