चोरीमुळे पाणीकपातीत वाढ; महिनाभरानंतर पुन्हा घेणार ‘पाणीबंद’चा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:34 AM2018-03-24T03:34:37+5:302018-03-24T03:34:37+5:30

जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही.

Due to theft of water; Review of 'water tank' to be taken again after a month | चोरीमुळे पाणीकपातीत वाढ; महिनाभरानंतर पुन्हा घेणार ‘पाणीबंद’चा आढावा

चोरीमुळे पाणीकपातीत वाढ; महिनाभरानंतर पुन्हा घेणार ‘पाणीबंद’चा आढावा

Next

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही. पाणीचोरीच्या या गोरखधंद्यामुळेच नागरिकांवर प्रत्येक आठवड्याला पाणीकपातीचा प्रसंग ओढवल्याचे उघड झाले आहे.
काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तरीही पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणासह आंध्रा धरणातून होणाºया पाणीपुरवठ्यात सुमारे सात टक्के म्हणजे ५४ दशलक्ष घनमीटर पाण्याची वार्षिक तूट उघडकीस आली. ती भरून काढण्यासाठी जानेवारीपासूनच १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात लागू केली. मात्र, तरीही पाण्याची चोरी सुरूच राहिली. यामुळे ही कपात वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. १९ मार्चपासून ही कपात लागू केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी महापालिका आता सोयीनुसार करणार आहेत. जादा पाणी उचलण्यातील मनमानी, पाण्याची चोरी याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी बातम्या दिल्या होत्या. पण त्यावर अंकुश न ठेवल्याचे परिणाम लाखो नागरिकांना भोगावे लागत आहेत.
पालिकांसह पाणी उचलणाºया संस्थांनी मंजूर कोट्यानुसार पाणी उचलल्यास पाणीकपातीची गरज भासणार नाही. परंतु प्रत्येक पालिकेत ३५ ते ४० टक्के पाणीगळती, चोरी असून ती रोखली जात नाही. काही पालिकांत तर ग्ही गळती-चोरी मोजण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे पालिका गरजेपेक्षा जास्त पाणी उचलतात. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्याने सध्या महिन्यातून दोन दिवस कपात होती. ती वाढवून चार दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरानंतर पाणीसाठ्याचा आढावा ही कपात कायम ठेवायची की नाही, ते ठरवले जाईल, असे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार यांनी सांगितले.
उल्हास नदी व बारवी धरणातून ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आदी शहरांना पाणीपुरवठा होतो. यंदा त्यांची पाणीटंचाईतून मुक्तता होईल, असे वाटेत होते. पण, प्रत्येक यंत्रणेने जादा पाणी उचलल्याने चोरी होत असल्याचे जानेवारीतील सर्वेक्षणातून निदर्शनात आले. जनसेवेसाठी पाणीचोरी करत असल्याचे सांगून महापालिका त्यांच्या मनमानीवर पडदा टाकत आहेत. त्याचे परिणाम नागरिकांना आता भोगावे लागत आहेत. त्यांना चार दिवस त्याची झळ सोसावी लागेल.

- मंजूर पाणीकोट्यापेक्षा कधीकाळी पाच ते दहा टक्के जादा पाणी उचलण्यास हरकत नाही. पण, या सवलतीचा गैरफायदा सक्तीच्या कालावधीतही सुरूच ठेवल्यामुळे पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. लघुपाटबंधारे विभागाच्या याआधीच्या अहवालानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका त्यांच्या मंजूर पाणीकोट्यापेक्षा ३० टक्के जादा पाणी उचलत आहे.
तर, एमआयडीसीही सर्वाधिक म्हणजे ३५ टक्के जादा पाण्याची चोरी-उचल करत असल्याचे निदर्शनास आले. याप्रमाणेच टेमघर, एमजेपी, आदी संस्था सुमारे पाच-दहा टक्के जादा पाणी उचलत असल्याची निरीक्षण लघुपाटबंधारे विभागाने नोंदवलेले आहे.
कल्याण-डोंबिवली २३४ दशलक्ष लीटर (एमएलडी) मंजूर पाणीपुरवठ्याऐवजी दिवसाला ३१० एमएलडी म्हणजे ३० टक्के जादा पाणी रोज उचलत आहे. याप्रमाणेच एमआयडीसीदेखील ५८३ एमएलडीऐवजी रोज सर्वाधिक ७८० एमएलडी पाण्याची चोरी करत असल्याचे चौकशीअंती उघड झाले.
ठाण्याच्या काही भागांसह भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणाºया टेमघरला रोज २८५ एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी आहे. पण, तेही ३०० एमएलडी म्हणजे सरासरी १० टक्के जादा पाणीउचलत आहेत. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिकांना पाणीपुरवठा करणारी एमजेपी ९० एमएलडीऐवजी १०० एमएलडी म्हणजे १० टक्के जादा पाणी उचलत असल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Due to theft of water; Review of 'water tank' to be taken again after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी