ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणाऱ्यांनी जाळले शेत, ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:59 PM2018-10-23T23:59:38+5:302018-10-23T23:59:43+5:30

केडीएमसीच्या २७ गावांमधील सोनारपाडा येथे मंगळवारी शेतजमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणा-या चौघांनी शेत जाळले.

The drowned by the drone, the villagers are angry with the farmed fire | ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणाऱ्यांनी जाळले शेत, ग्रामस्थ संतप्त

ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणाऱ्यांनी जाळले शेत, ग्रामस्थ संतप्त

Next

कल्याण : केडीएमसीच्या २७ गावांमधील सोनारपाडा येथे मंगळवारी शेतजमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणा-या चौघांनी शेत जाळले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी पोलीस आयुक्तांलयाकडून परवानगी घेतल्याचे पत्र त्यांनी दाखवले आहे. याप्रकरणाची शहानिशा पोलीस करीत आहेत.
सोनारपाडा येथे एका बिल्डरने जमीन घेतली असून, त्याला शेतकºयांचा विरोध आहे. शेतजमिनीवरील पिकपाण्याची नोंद व्हावी, यासाठी शेतकºयांनी कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी तहसीलदारांनी सोनारपाडा येथे जाऊन पीक पाण्याची नोंद केली होती.
त्यानंतर दुपारी ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षण सुरू झाले. सर्वेक्षण करणाºया चौघांनी एकाचे शेत जाळले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना पकडले. ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षणाची परवानगी कोणी दिली, ओळखपत्र आहे का, असे ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी कोणतीच माहिती दिली. त्यामुळे त्यांना बिल्डरने पाठविले असावे, असा ग्रामस्थांचा संशय बळावला. ग्रामस्थांनी चौघांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्याविरोधात बेकायदा जमिनाचे सर्वेक्षण करून शेत जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे.
>सर्वेक्षण कशासाठी?
ठाणे पोलीस आयुक्तांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी परवानगी दिल्याचे पत्र चौघांनी दाखवले आहे. त्यात महापालिकेच्या नगररचनाकार मा. द. राठोड यांना ही परवानगी दिली आहे.
२७ गावांच्या विकासासंदर्भात हे सर्वेक्षण करायचे आहे, असे त्यात म्हटले आहे. २७ गावांचा विकास आराखडा तर २०१५ मध्ये मंजूर झालेला आहे, तर मग हे सर्वेक्षण कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी २७ गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी केली आहे.

Web Title: The drowned by the drone, the villagers are angry with the farmed fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.