'डॉ. बाबासाहेबांचा भिवंडीत उभारणार पुतळा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:14 AM2019-06-16T00:14:20+5:302019-06-16T00:14:56+5:30

दोन महिन्यांत काम होणार पूर्ण

'Dr. Statue of Babasaheb | 'डॉ. बाबासाहेबांचा भिवंडीत उभारणार पुतळा'

'डॉ. बाबासाहेबांचा भिवंडीत उभारणार पुतळा'

Next

भिवंडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भिवंडीला दोन वेळा भेट दिली होती. तेव्हा ते येथील सरकारी विश्रामगृहात थांबले होते. सध्या विश्रामगृहाच्या जागेवर महापालिकेचे मुख्यालय आहे. याची आठवण म्हणून पालिकेच्या आवारात पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे निश्चित केले होते. त्या जागेचे भूमिपूजन झाले असून दोन महिन्यात येथे पुतळा उभारू असे आश्वासन महापौर जावेद दळवी यांनी दिले.

आमदार रूपेश म्हात्रे, महेश चौगुले, आयुक्त मनोहर हिरे, उपमहापौर मनोज काटेकर, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, स्थायी समिती सभापती मदन नाईक, विरोधी पक्षनेते शाम अग्रवाल, सभागृहनेते मतलुब सरदार, भाजपचे गटनेते निलेश चौधरी, कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील, काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी, शिवसेना गटनेते संजय म्हात्रे, विकास निकम, नगरसेवक प्रशांत लाड आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार म्हात्रे म्हणाले की, या पुतळ्यातून मानवतेचा संदेश दिला जाईल. आमदार चौगुले म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार मोठे असून ते अंगिकारले पाहिजेत. तर आयुक्त हिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,पुतळ्याचे काम करून घेणे माझे कर्तव्य होते. पुतळ्याचा विषय हा नागरिकांच्या भावनेचा व जिव्हाळ्याचा होता. समता, बंधुत्व विचारांची प्रेरणा येथून आपल्याला मिळेल,असे आयुक्तांनी सांगितले. स्थायी समिती सभापती मदन नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.

४५ लाखांचा खर्च
निकम यांनी या संपूर्ण प्रक्रि येचा आढावा घेतला. शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पुतळा उभारण्याच्या कामी एकूण ४५ लाख ५५ हजार खर्च अपेक्षित असून या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची १५ फूट व त्यावर डॉ. बाबासाहेबांचा दहा फुटाचा असा एकूण २५ फुटाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामी लागणाºया सर्व विभागांच्या परवानगी घेण्यात आल्या असून त्याप्रमाणे पुतळ्याचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Dr. Statue of Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.