दुहेरी खून प्रकरणात शिक्षकाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:44 AM2017-08-18T05:44:24+5:302017-08-18T05:44:26+5:30

पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून करून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न करणा-या एका शिक्षकास ठाणे न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

In the double murder case, the teacher gave life imprisonment | दुहेरी खून प्रकरणात शिक्षकाला जन्मठेप

दुहेरी खून प्रकरणात शिक्षकाला जन्मठेप

Next

ठाणे : पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून करून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न करणा-या एका शिक्षकास ठाणे न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षकाचा मुलगाच या प्रकरणात फिर्यादी होता. वडिलांविरुद्ध त्याने नोंदवलेली साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली.
ठाण्यातील बाळकुम येथील वर्धमान गार्डन सोसायटीचे रहिवासी संजय उंबरकर आणि त्यांची पत्नी स्वाती हे भिवंडी येथील एका शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. हे कुटुंब मूळचे अकोल्याचे असून त्यांना अथर्वा आणि ऋग्वेद ही दोन मुले होती. कालांतराने स्वाती यांना अंतर्गत कारणांमुळे नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यामुळे कुटुंबामध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली. या आणि इतर किरकोळ कारणांवरून पतीपत्नीमध्ये वाद व्हायचे.
२ जुलै २०१२ रोजी पतीपत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निश्चय केला. कागदपत्रांची बॅग घेऊन त्या बहिणीकडे जाण्यासाठी निघाल्या. त्या वेळी अथर्वाचे वय ९ वर्षे, तर ऋग्वेद १५ वर्षांचा होता. मुले लहान असल्यामुळे त्यांचा ताबा रीतसर न्यायालयाकडूनच घ्यावा, असा विचार करून त्या एकट्याच घराबाहेर पडल्या. लिफ्टजवळच पती संजयने त्यांना थांबवून घरामध्ये ओढत नेले. बेडरूममध्ये नेऊन सुºयाने घाव घातले. आईची आरडाओरड ऐकून मुलांनी दरवाजा जोरजोरात ठोठावला. संजयने दरवाजा उघडून ऋग्वेदला ढकलले आणि अथर्वाला आतमध्ये ओढले. आईवडिलांच्या भांडणात अथर्वा नेहमी आईची बाजू घ्यायची. त्यामुळे त्याच्या मनात तिच्याविषयीही राग होता. आतमध्ये ओढल्यानंतर सुºयाने भोसकून तिचाही खून केला. त्यानंतर, चाकूने स्वत:वर घाव करून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
ऋग्वेदने याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संजय उंबरकरला अटक केली. तेव्हापासून आजतागायत तो कारागृहातच आहे. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी याप्रकरणी ३१ साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्या. पी.आर. कदम यांनी संजय उंबरकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
>मुलाने दिली वडिलांविरुद्ध साक्ष
ऋग्वेद हा या खून प्रकरणाचा एकमेव प्रत्यक्षदर्शी होता. न्यायालयासमोर त्याने वडिलांविरुद्ध साक्ष नोंदवली. महत्त्वाचे म्हणजे तो शेवटपर्यंत साक्षीवर ठाम होता. खबरदारी म्हणून सरकारी पक्षाने कलम १६४ अंतर्गत न्यायदंडाधिकाºयांसमोर त्याचा जबाब नोंदवला होता.

Web Title: In the double murder case, the teacher gave life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.