Dombivlit Ravavavari Six Guinjans Greeting Ceremony | डोंबिवलीत रविावरी सहा गुणीजनांचा अभिवादन सोहळा
डोंबिवलीत रविावरी सहा गुणीजनांचा अभिवादन सोहळा

ठळक मुद्दे टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणात कार्यक्रम नागरि सत्कार समितीच्या उपक्रमाचे ५ वे वर्ष

डोंबिवली: निवडक नामवंत नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्याची प्रथा विविध क्षेत्रात काम करणा-या ४१ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘नागरी सत्कार समिती’ने २०१४ साली सुरु केलेल्या सहा गुणीजनांचा सत्कार यंदाही करण्यात येणार आहे. यावेळी अंधत्व निवारण कार्यकर्त्या- सरोज नेरुरकर, आर्थिक गुंतवणूक क्षेत्रात योगदान देणा-या हेमा धारगळकर, कामगार क्षेत्र- श्रीनिवास जोशी, ज्येष्ठ नागरिक संघटन-क्षेत्र रमेश पारखे, शिक्षण आणि राष्ट्रीय सामाजिक सेवा - डॉ. कृष्णन नम्बुद्री तसेच रोटरी, वैद्यकीय मदत - एन. आर. हेगडे यांचा सन्मान समिती करणार आहे.
हा सोहळा टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणावर रविवार, ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता जेष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितित आणि जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .
गुणीजनांच्या कार्याचा आदर्श पुढल्या पिढ्यांपुढेही रहावा, आणि त्यातून स्फूर्ती घेत सामाजिक बांधिलकी मानणारी, गावकीचे भान राखणारी तरुण कार्यकर्त्यांची नवी पिढी उभी रहावी या उद्देशाने नागरी सत्कार समिती पाच वर्षांपासून सहा डोम्बिवलीकर स्त्री-पुरुषांचा सन्मान करते. शहराच्या सव्वाशे वर्षांच्या वाटचालीतल्या मोठ्या टप्प्याची साक्षीदार असलेली आणि आपल्या अंगभूत गुणांच्या आधारे शहराच्या सर्वांगीण विकासास हातभार लावलेली अशी मोजकीच मंडळी आता वयोमान उलटूनही सार्वजनिक क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यातली काही त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहेत, तर काहींनी प्रसिद्धीची अपेक्षाही न ठेवता शहरासाठी आपलं अनमोल योगदान दिलं आहे. ज्यांनी प्रसिद्धीच्या झोतात राहणं पसंत केलं नाही, अशांचा सत्कार करण्याचा समिती प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
 


Web Title: Dombivlit Ravavavari Six Guinjans Greeting Ceremony
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.