डोंबिवली - येथील नमो रमो नवरात्रौत्सवाला केंद्रिय  पुरषोत्तम रुपाला यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी डोंबिवलीकरांचा गरब्यासाठीचा उत्साह आणि देशप्रेम बघून भारवून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रुपाला म्हणाले की, मातृभूमीबद्दल येथिल नागरिकांना वाटणारा आदर आणि प्रेम हे शब्दात वर्णन करता न येण्यासारखे आहे. एवढया गर्दीतही ए मेरे वतन के लोगो या गाण्याच्या ठेक्यावर केवळ भारत माता की जय... वंदे मातरम् साठीच नागरिकांनी गरब्याच्या प्रचंड जल्लोषात हुँकार दिला. तो वाखाणण्यासारखा आहे.
डोंबिवलीकरांचा आवाज नक्कीच दिल्लीचे तख्तापर्यंत गेला, म्हणुनच या शहराला रवींद्र चव्हाण हे राज्यमंत्रीपद मिळाले. ते केवळ चव्हाण यांचे योगदान नसून डोंबिवलीकर त्यांच्यापाठीशी उभे असल्याने त्यांना मिळाल्याचे सांगण्यात आले. यागोष्टीचा निश्चित आनंद आहे. डोंबिवलीचे सांस्कृतिक वैभव केवळ ऐकून होतो आज अनुभवायला मिळाले. प्रचंड आनंद होतो, सारा समाज एकत्र झाल्यावर असेही ते म्हणाले. पारंपारीक पोषाखात कोणत्याही विशेष जाती-धर्माचा असा नाही तर देशबांधवांचा हा मेळा बघण्याची अनुभूती मला मिळाल्याचे धन्य झालो असेही ते म्हणाले. डोंबिवलीकरांच्या वतीने राज्यमंत्री चव्हाण यांनी रुपाला यांचा यथोचित सन्मान केला. रुपाला यांनीही नागरिकांशी संवाद साधत भारत माता की जय... च्या घोषणा देत समाधान व्यक्त केले.
‘एलफीस्टन रेल्वे दुर्घटनेमुळे गरब्याचा कार्यक्रम रद्द’
एलफीस्टन येथिल रेल्वे प्रवाशांच्या र्दुदैवी अपघाताच्या घटनेमुळे डोंबिवलीतील नमो रमो नवरात्रौत्सव आणि रासरंग नवरात्रौत्सव हे दोन्ही उपक्रम रद्द करण्यात आले असल्याचे आयोजक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहिर केले.