विद्यार्थ्यांसह डोंबिवलीकर रमले फुलापाखरांच्या प्रदेशात : शनिवार-रविवार बालभवनमध्ये प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:03 PM2017-11-25T15:03:20+5:302017-11-25T15:13:36+5:30

फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात आले आहे. शनिवार-रविवार असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत डोंबिवलीकरांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. शनिवारी या उपक्रमाच्या शुभारंभालाच प्रदर्शन बघण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती. शहरातील ज्ञानमंदिर, आजदेगाव जिल्हा परिषद शाळा, टिळकनगर शाळा, शिवाई बालक मंदिर या शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद लुटला.

Dombivlikar ramle flowers with students: exhibition in Saturday-Sunday Balbhavan | विद्यार्थ्यांसह डोंबिवलीकर रमले फुलापाखरांच्या प्रदेशात : शनिवार-रविवार बालभवनमध्ये प्रदर्शन

फुलापाखरांच्या प्रदेशात - शनिवार-रविवार बालभवनमध्ये प्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्दे फुलपाखरांसह पतंगांच्या ८०० छायाचित्रांचा समावेशज्ञानमंदिर, आजदेगाव जिल्हा परिषद शाळा, टिळकनगर शाळा, शिवाई बालक मंदिर शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा आनंद लुटला

डोंबिवली: फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात आले आहे. शनिवार-रविवार असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत डोंबिवलीकरांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. शनिवारी या उपक्रमाच्या शुभारंभालाच प्रदर्शन बघण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती. शहरातील ज्ञानमंदिर, आजदेगाव जिल्हा परिषद शाळा, टिळकनगर शाळा, शिवाई बालक मंदिर या शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद लुटला.
या प्रदर्शनाचा शुभारंभ कल्याण बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिरिष देशपांडे, इन्डो अमाईन या रासायिनिक कंपनीचे संचालक विजय पालकर, भाजपाचे नगरसेवक महेश पाटील व रोटरीचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच हे छायाचित्र प्रदर्शन डोंबिवलीत भरवण्यात आले असून भ्रमंतीप्रिय, कलारसिक डोंबिवलीकरांनी ते बघण्यासाठी आवर्जून यावे असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. निसर्गाच्या सानिध्यात दोन दिवस, ते ही हाकेच्या अंतरावर आपल्याच शहरात डॉ. राजेश महाजन यांच्यामुळे ही संधी मिळाली आहे. डोंबिवलीकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. डॉ. महाजन यांचा होसला वाढवावा असे आवाहन अ‍ॅड. देशपांडे यांनी केले. छंदाला मोल नतसो, त्यामुळेच हे प्रदर्शन विनामूल्य असून डोंबिवलीकरांनी त्याचा आनंद लुटावा असे नगरसेवक पाटील म्हणाले. वैद्य भाऊ सुळे यांनीही या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली, छायाचित्र संकलनाबद्दल डॉ. महाजन यांचे कौतुक केले.
प्रदर्शनातील वैशिष्ठ्यांसंदर्भात डॉ. महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातील कोकणात चिपळुण, रत्नागिरी, महड, जळगाव, डोंबिबली, नासिक, पुणे, लोणावळा, खंडाळा, ठाणे आदी भागांमध्ये प्रवास, भ्रमंतीमधून गेल्या आठ वर्षामध्ये डॉ. महाजन यांनी १५०० हून अधिक छायाचित्र काढली, त्यांचे संकलन केले. त्यातील निवडक ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींची फुलपाखर, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश प्रदर्शनामध्ये करण्यात आला आहे. संकलीत केलेले छायाचित्र आणि त्याखाली तपशीलात माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये २०० विविध रंगांची फुलपाखरे, ४००प्रकारचे,पतंग, यासह २०० प्रकारचे नाकतोडे, चतुर, कोळी आदीं किटकांचा समावेश आहे. जगात अतिशय दूर्मिळ असा खेकड्यांना खाणारा बेडकाचा देखिल फोटो या ठिकाणी प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. हा बेडुक भारतात केवळ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात, उडीसा येथे तर तैवान आणि चीन, फिलीपाईन्स या देशांमध्येच आढळत असल्याचे डॉ. महाजन यांनी आवर्जून सांगितले.
============

Web Title: Dombivlikar ramle flowers with students: exhibition in Saturday-Sunday Balbhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.