Dombivliit Gan Gan Gana Botechi Dhoon | डोंबिवलीत गण गण गणात बोतेची धून
डोंबिवली गजानन विजय ग्रंथामधील अध्याय वाचन

ठळक मुद्देश्री गजानन महाराजांच्या उपासना केंद्रामध्ये प्रकट दिन सोहळा गजानन विजय ग्रंथामधील अध्याय वाचन

डोंबिवली: शहरातील ठिकठिकाणी असलेल्या संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या उपासना केंद्रामध्ये बुधवारी पहाटेपासूनच महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. ठिकठिकाणी गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय अशा घोषणा आणि धून लावण्यात आली होती. त्यामध्ये अबालवृद्ध दंग झाले होते.
श्री गजानन महाराज कृपासेवा, महात्मा फुले रोडवरील उपासना केंद्र, पूर्वेकडे शास्त्री हॉल दत्तनगर, भगतसिंग रोडवरील उपासना केंद्र, आदित्य मंगल कार्यालय आदी ठीकाणी प्रकट दिन सोहळा संपन्न झाला. पश्चिमेकडील शेखर जोशी यांच्या महाराजांच्या मंदिरासह भगतसिंग रोड आणि शास्त्री हॉल येथे झालेल्या सोहळयामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. मंगळवारी झालेल्या पालखी सोहळयापासून बुधवारी पहाटेपासून पालखी सोहळा, दुग्धाभिषेक, गजानन स्तोत्राचे सामुहिक वाचन, गजानन विजय ग्रंथामधील अध्याय वाचन यासह गण गण गणात बोते धून, भजन आदीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बहुतांशी सर्व ठिकाणी पारंपारिक पद्धतीने महाराजांचा प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर महाप्रसादासाठी भक्तांनी अलोट गर्दी करत महाराजांचा जयजयकार करत सोहळयाचा आनंद लुटला.


Web Title: Dombivliit Gan Gan Gana Botechi Dhoon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.