रिक्षाचालकांकडून डोंबिवलीत लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:19 AM2018-11-01T00:19:08+5:302018-11-01T00:19:23+5:30

शहरात बहुतांश रिक्षा सीएनजीवर धावत असतानाही पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ झाल्याने भाडेवाढ देण्याची मागणी आदर्श रिक्षा-चालक-मालक संघटनेने केली आहे.

Dombivli looted by rickshaw drivers | रिक्षाचालकांकडून डोंबिवलीत लूटमार

रिक्षाचालकांकडून डोंबिवलीत लूटमार

Next

डोंबिवली : शहरात बहुतांश रिक्षा सीएनजीवर धावत असतानाही पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ झाल्याने भाडेवाढ देण्याची मागणी आदर्श रिक्षा-चालक-मालक संघटनेने केली आहे. सरकारने ही वाढ मंजूर केली नसतानाही संघटनेने परस्पर शेअर रिक्षाच्या भाड्यात प्रतिसीट दोन रुपयांची वाढ करत प्रवाशांची लूटमार सुरू केली आहे. याप्रकरणी आदर्श संघटना आणि काळू कोमास्कर यांना नोटीस बजावल्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) संजय ससाणे यांनी सांगितले.

पूर्वेतील रामनगर परिसरातून आयरेगाव, लक्ष्मणरेखा, तुकारामनगर, सुनीलनगर, अशोकवाटिका, नांदिवली रोड, पराग बंगला, नांदिवली रोड-नाला व मठ, नांदिवली टेकडी, सर्वोदय पार्क, केबल आॅफिस, गावदेवी मंदिर, गजानन चौक, देसलेपाडा, गार्डियन स्कूल, लोढा चौक, नवनीतनगर, भोपर कमान, भोपर बसस्टॅण्ड, जी.आर. पाटील शाळा, रेल्वेफाटक आदी भागांत शेअर रिक्षा जातात. संघटनेने रामनगर परिसरात बॅनरबाजी करत या मार्गांवर बेकायदा दोन रुपयांची भाडेवाढ केली आहे. त्यामुळे या मार्गांवर आता किमान भाडे १० रुपये, तर कमाल भाडे २३ रुपये असणार आहे. इंधनदरवाढ कमी करा, अन्यथा भाडेवाढीला मंजुरी द्यावी. तसेच प्रवाशांनी रिक्षाचालकांना सहकार्य करावे, असे आवाहनही या बॅनरवर करण्यात आले आहे.
दरम्यान, या पद्धतीने कोणीही बेकायदा भाडेवाढ करू शकत नाही. परस्पर बॅनर लावून भाडेवाढ केल्याचे जाहीर करणाऱ्या संघटनेवर आणि अशी भाडेवाढ घेणाºया रिक्षाचालकांवर कारवाई होणार आहे, असे ससाणे यांनी स्पष्ट केले. प्रवाशांनी जादा दोन रुपये प्रतिसीट न देता नेहमीचेच भाडे द्यावे, असेही ते म्हणाले. त्यानंतरही कोणी रिक्षाचालक जबरदस्ती करत असल्यास त्याची माहिती तातडीने आरटीओ, वाहतूक पोलीस आदींना द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

कारवाईकडे कानाडोळा
डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड, कुंभारखाणपाडा मार्गावरही काही महिन्यांपासून शेअर रिक्षाचालक प्रतिसीटसाठी बेकायदा दोन रुपये वाढीव भाडे घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांना आठऐवजी १० रुपये मोजावे लागत आहेत.
या मार्गावर रिक्षाचालकांना भाडेवाढ देण्यासंदर्भात आरटीओ, वाहतूक पोलिसांनी सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवालही त्यांनी वरिष्ठ पातळीवर दिला आहे. त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही. मात्र, वाढीव भाडे घेणाºया रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Web Title: Dombivli looted by rickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.