डोंबिवलीत जनजीवन सुरळीत, शाळाही झाल्या सुरु : मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 08:40 AM2017-12-06T08:40:55+5:302017-12-06T08:58:04+5:30

ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता. मात्र बुवधारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप घेतली होती, हवामानातही गारवा कमी झाला होता, आणि उकडायला सुरुवात झाली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जनजीवन सुरळीत होते.

Dombivli lives smoothly, school also starts: Transport of Central Railway on the road | डोंबिवलीत जनजीवन सुरळीत, शाळाही झाल्या सुरु : मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर

डोंबिवलीत जनजीवन सुरळीत

Next
ठळक मुद्दे पावसाने घेतली उघडीप-आकाश ढगाळलेलेच पहाटेपासूनच रेल्वे रुळावर असल्याने चाकरमान्यांसह चैत्यभूमीवर जाणा-या अनुयायांना दिलासा गारठा कमी झाला अन् उकाडा जाणवू लागलामहावितरणचे मात्र सतर्कतेचे आदेश

डोंबिवली: ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता. मात्र बुवधारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप घेतली होती, हवामानातही गारवा कमी झाला होता, आणि उकडायला सुरुवात झाली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जनजीवन सुरळीत होते, शाळाही सुरु असल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत दिनचर्येला सुरुवात केली.काल मध्य रेल्वेची लोकलसेवा धुक्यामुळे सकाळच्या सत्रात १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होती, पण बुधवारी मात्र पहाटेपासूनच रेल्वे रुळावर असल्याने चाकरमान्यांसह चैत्यभूमीवर जाणा-या लाखो अनुयायांना दिलासा मिळाला.
महावितरणने मात्र बुधवारीही त्यांच्या कर्मचा-यांना सतर्कतेचा इशारा देत वीजपुरवठा बाधित होणार नाही, नागरिकांची गैरसोय होणार नाही यावर भर द्यावा असे आदेश दिले होते. दरम्यान, सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे डोंबिवली पश्चिमेकडील कोपररोड भागात मध्यरात्री पावणेबारा वाजता वीजपुरवठा खंडीत झाला होता, तासाभरात महावितरणच्या कर्मचा-यांनी आवश्यक ती दुरुस्ति करुन वीजपुरवठा सुरळीत केला. मंगळवारी दिवसभरात रामनगर, दत्तनगर आदी भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र सुमारे वीस मिनिटे ते अर्धा तासात पुन्हा सुरळीत झाला. दिवसभर मुख्य वीजपुरवठा केंद्रात गारठ्यामुळे स्वीच ट्रीप होण्याच्या घटना घडल्या, पण महावितरणच्या कर्मचा-यांनी सतर्कत दाखवत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत केला होता. दिवसभरात कुठेही फार वेळ वीजपुरवठा खंडीत होता अशा घटना घडल्या नाहीत. बुधवारीही पावसाची शक्यता असून रात्रंदिवस वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवणे, यासह अन्य आपात्कालीन यंत्रणेने सतर्क रहावे असे आदेश देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. दिक्कड यांनी दिली. बाजीप्रभु चौकातील मेन फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, पण तात्काळ दुस-या फिडरमध्ये लाइनमध्ये वीजपुरवठा सुरु करण्यात आला. महािवतरणचा वीजपुवठा खंडीत झाल्याने रामनगर, बाजीप्रभु चौक, भगतसिंग रोड आदी ठिकाणी इंटरनेट सुविधेत अडथळे आले होते. त्यामुळे दिवसभर काही ग्राहकांना इंटरनेट सुविधा सुरळीतपणे मिळू न शकल्याने नाराजी व्यक्त झाली होती, बुधवारी सकाळपासून ती सेवाही सुरळीत असल्याने ग्राहकांना दिलासा होता. मंगळवारी दिवसभर तसेच रात्रीच्या कमी अधिक पावसात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती अग्नीशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली होती. बुधवारी सकाळी पावसाने उघडीप घेतली असली तरी महापालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेलाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

Web Title: Dombivli lives smoothly, school also starts: Transport of Central Railway on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.