Dombivali ferries took out a rally in front of the rally | डोंबिवलीत फेरीवाल्यांनी काढला मोर्चा, मोर्चामुळे एकमेव ब्रिजवर वाहतूक कोंडी

 डोंबिवली - महापालिकेने रेल्वे स्थानकापासून 150 अंतरावर पांढऱ्या रंगाने पट्टे मारण्यास सुरुवात केल्यामुळे फेरीवाले संतापले असून त्यांनी आज डोंबिवलीत महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला आणि विनापरवानगी मोर्चा काढणा-यांना अटक करण्यात आली. या मोर्चामुळे डोंबिवलीकरांचे मात्र हाल झाले.पश्चिमेतुन निघालेल्या या मोर्चामुळे पूर्व पश्चिम जोडणारा एकमेव पुलावर  40 मिनिटे वाहतूकिचा खोळंबा झाला.साहजिकच संपूर्ण डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेवत याचा ताण पडून  शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान मनसेनं आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत रेल्वे स्थानकाबाहेर मार्किंग केल्याचं स्वागत केलं असून आता  केडीएमसी,पोलिस यांची फेरीवाला मुक्त परिसर करण्याची जबाबदारी असल्याच स्पष्ट केलं.तर दुसरीकडे मनसेनं आज डोंबिवली,कोपर आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक व्यवस्थापनाला स्थानक परिसर फेरीवाला मुक्त न ठेवल्यास कोर्टाची अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा मनसे तर्फे देण्यात आला.