दिवाळीत ठाण्यात लखलखाट, ठामपाकडून रोषणाईचा साज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:34 AM2017-10-19T06:34:11+5:302017-10-19T06:34:38+5:30

अस्वच्छ व नादुरुस्त पदपथ, सतत वर्दळीच्या रस्त्यावर असलेला कचरा असे ठाण्यात दिसणारे नेहमीचे चित्र. मात्र, दिवाळीनिमित्त पालिकेने घेतलेल्या पुढाकाराने संपूर्ण शहराचे स्वरूपच बदलले असून यात एक हजार...

 Diwali in Thakal, Lakhkhakhat, Thamapala, Lohalakhat | दिवाळीत ठाण्यात लखलखाट, ठामपाकडून रोषणाईचा साज  

दिवाळीत ठाण्यात लखलखाट, ठामपाकडून रोषणाईचा साज  

googlenewsNext

ठाणे : अस्वच्छ व नादुरुस्त पदपथ, सतत वर्दळीच्या रस्त्यावर असलेला कचरा असे ठाण्यात दिसणारे नेहमीचे चित्र. मात्र, दिवाळीनिमित्त पालिकेने घेतलेल्या पुढाकाराने संपूर्ण शहराचे स्वरूपच बदलले असून यात एक हजार अभियंत्यांची मेहनत रंग लायी है, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी शहरातील तब्बल २०० किमीचे वर्दळीचे रस्ते अक्षरश: धुऊन काढले आहेत. तसेच पदपथ दुरु स्त करून त्यांना रंगरंगोटी केली आहे. दिवाळीपूर्वीच आखलेल्या अ‍ॅक्शन प्लानच्या माध्यमातून हे शक्य झाले असून आता अशा प्रकारची विशेष स्वच्छता वर्षभर राहावी, यासाठी १० कोटींचा निधी देण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येऊ घातले आहे. काही प्रकल्पांच्या कामालादेखील सुरु वात झाली आहे. एरव्ही, शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असली, तरी दिवाळीनिमित्त शहराचे स्वरूप बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. यासाठी एक अ‍ॅक्शन प्लानदेखील तयार केला होता. पावसाळ्यामध्ये शहरातील अनेक रस्त्यांची आणि पदपथांची अवस्था बिकट झाली होती. अनेक ठिकाणी ते उखडले होते. रस्त्याच्या बाजूचा परिसर रंगवणे, मार्किंग करणे तसेच उखडलेले पदपथ दुरु स्त करणे, अशी मोठी मोहीम राबवली जात असल्याची माहिती शहर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. वर्षानुवर्षे भंगार गाड्या, अनधिकृत पार्किंग, गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलेल्या आणि येणाºयाजाणाºया नागरिकांसाठी मनस्ताप ठरलेल्या नितीन कंपनीजवळील पुलाखाली आता आकर्षक उद्यान होणार आहे.

शहरातील रस्ते, चौकांनी टाकली कात
विविध खेळांच्या सुविधा, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, बालगोपालांसाठी खेळणी आणि लक्ष वेधून घेणारी आकर्षक विद्युत रोषणाई अशा सुविधांनी ही बाग जणू एक नंदनवनासारखीच भासेल. तर, दुसरीकडे मानपाडा उड्डाणपुलाखालचे स्वरूपदेखील पूर्णपणे बदलले आहे. उड्डाणपुलांबरोबरच शहरातील रस्ते, फुटपाथ, महत्त्वाच्या चौकांनीदेखील कात टाकली आहे. दिवाळीपूर्वीच या मोहिमेला सुरु वात झाली असून यामध्ये २०० किमीचे रस्ते पाण्याने धुऊन काढले आहेत. चौकदेखील धुतले असून त्यांचीही आकर्षक रंगरंगोटी केली आहे.

Web Title:  Diwali in Thakal, Lakhkhakhat, Thamapala, Lohalakhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.