नदीतील विनापरवाना उचललेल्या पाण्याच्या विक्री विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:43 PM2019-05-26T18:43:58+5:302019-05-26T18:49:09+5:30

ठाणे : शहरातील नागरिकाना टँकरव्दारे पाणी विक्रीचा गोरख धंदा सध्या तेजीत आहे. बदलापूर येथील नदीतून शेकडो टॅकर पाणी शहरांमध्ये ...

 District officials in protest against the sale of unused water from the river! | नदीतील विनापरवाना उचललेल्या पाण्याच्या विक्री विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !

पाणी टंचाईच्या नावाखाली बदलापूर येथील नदीतून शेकडो टँकर पाणी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातील शहरांमध्ये विकले

Next
ठळक मुद्देविना परवाना पाणी उचलणा-या टँकरवाल्यांवर कडक कारवाई८०० ते एक हजार रूपये किंमतीत सोसायट्यांना या टँकरव्दारे पाणीमनमानीमुळे सोसायटीतील नागरिकांची आर्थिक लूट

ठाणे : शहरातील नागरिकाना टँकरव्दारे पाणी विक्रीचा गोरख धंदा सध्या तेजीत आहे. बदलापूर येथील नदीतून शेकडो टॅकरपाणी शहरांमध्ये रोजी विक्रीला जात आहे. विना परवाना पाणी उचलणा-या या टँकरवाल्याना सरकारी व राजकीय कृपाशिर्वाद आहे. यामुळे मनमानी पाण्याचा उपसा सुरू आहे. याविरोधात काही जेष्ठ नागरिक ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना साकडे घालण्याच्या तयारीत आहेत.
पाणी टंचाईच्या नावाखाली बदलापूर येथील नदीतून शेकडो टँकर पाणी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातील शहरांमध्ये विकले जात आहे. कडकडीत उन्हाळा, त्यात पाणी पुरवठा विभागांकडून कमी,अधिकप्रमाणात पाणी वितरणाची मनमानी रोजची डोके दुखी ठरली आहे. आठडतून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन धाब्यावर बसून कोणत्याही दिवशी, कधीही पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या मनमानीतून या टॅकरवाल्यांची पाणी विक्री सध्या तेजीत आहे. सुमारे ८०० ते एक हजार रूपये किंमतीत सोसायट्यांना या टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे.
पाणी पुरवठ्याच्या मनमानीमुळे सोसायटीतील नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. नगरपालिकाख् पोलिस आदी यंत्रणांकडूनही या विना परवाना पाणी उचलणा-या टँकरवाल्याना पाठिशी घातले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यास वेळीच आळा घालण्यासह विना परवाना पाणी उचलणा-या टँकरवाल्यांवर कडक कारवाई करावी, कपातीचा दिवस वगळता शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, टँकरने उचललेल्या पाण्याची विक्री वेळीच धांबवण्यात यावी. बदलापूर नदीसह अन्यही ठिकाणच्या नदीतील पाणी उचलण्यास बंदी घालावी आदींसाठी ठिकठिकाणचे जेष्ठ नागरिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालण्याच्या तयारीत आहे.
...........

Web Title:  District officials in protest against the sale of unused water from the river!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.