जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मुद्रा मेळाव्यांचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 07:08 PM2019-06-20T19:08:30+5:302019-06-20T19:14:12+5:30

बँकांमार्फत कर्ज पुरवठा केला जातांना लाभाथ्यांची यादी तपासण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावर या योजनेचा उद्देश रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती असा आहे. तेव्हा ही योजना रोजगार स्वयंरोजगारास अनुकूल असणा-या अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात यावी

District Collector's order to organize currency malls in the talukas of the district | जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मुद्रा मेळाव्यांचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर गुरूवारी जिल्हास्तरीय मुद्रा योजना समन्वय समितीच्या बैठकीत

Next
ठळक मुद्देप्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी बँका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक लाभाथ्यांची यादी तपासण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश

ठाणे : मुद्रा बँक योजना ही स्वयंरोजगाराला चालना देणारी योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक होतकरु तरु णांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मुद्रा योजना मेळाव्यांचे आयोजन करा, असे निर्देश ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरूवारी जिल्हास्तरीय मुद्रा योजना समन्वय समितीच्या बैठकीत दिले.
       जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहामध्ये पार पडली. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जे.एन भारती उपस्थित होते. या मेळाव्यांत कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले उमेदवार, ग्रामीण विकास प्रशिक्षक केंद्रातून प्रशिक्षित उमेदवार, तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी. यावेळी मुद्रा बँक योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बँका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक असल्याबाबत यावेळी मत मांडण्यात आले. बँकांमार्फत कर्ज पुरवठा केला जातांना लाभाथ्यांची यादी तपासण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावर या योजनेचा उद्देश रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती असा आहे. तेव्हा ही योजना रोजगार स्वयंरोजगारास अनुकूल असणा-या अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात यावी, त्यासाठी तालुकास्तरावर मेळावे आयोजित करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
...........
 

Web Title: District Collector's order to organize currency malls in the talukas of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.