गृहनिर्माण संस्थांमधील वाद सोडवण्यासाठी हाऊसिंग अदालत सुरु करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 06:26 PM2018-01-02T18:26:31+5:302018-01-02T18:26:42+5:30

 मीरारोड मध्ये गृहनिर्माण संस्थेतील वादातून घडलेली हत्या, गुन्हे व तक्रारींची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी गृहनिर्माण संस्थांमधील वादांना गाभीर्याने घेतले आहे. गृहनिर्माण संस्थांमधील वादांची समस्या मोठी असून ती सोडवण्यासाठी हाऊसिंग अदालत कार्यक्रम घेण्याची गरज आहे.

District Collector urges to start Housing Court to resolve disputes between housing societies | गृहनिर्माण संस्थांमधील वाद सोडवण्यासाठी हाऊसिंग अदालत सुरु करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

गृहनिर्माण संस्थांमधील वाद सोडवण्यासाठी हाऊसिंग अदालत सुरु करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

Next

मीरारोड : मीरारोड मध्ये गृहनिर्माण संस्थेतील वादातून घडलेली हत्या, गुन्हे व तक्रारींची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी गृहनिर्माण संस्थांमधील वादांना गाभीर्याने घेतले आहे. गृहनिर्माण संस्थांमधील वादांची समस्या मोठी असून ती सोडवण्यासाठी हाऊसिंग अदालत कार्यक्रम घेण्याची गरज आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल असे प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. तर पोलीस ठाण्याच्या अधिका-यांना गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन समस्यांबद्दल रहिवाशांशी बोलण्याचे निर्देश दिल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील म्हणाले. सोनसाखळी चोरांनी चोरलेली २५ लाखांची मंगळसूत्र, सोनसाखळ्या आदी दागिने पोलिसांनी महिलांना परत केले.
मीरा भाईंदर मधील सोनसाखळी चोरींच्या ३४ गुन्ह्यांतील ८३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, सोनसाखळ्या असे २० लाख १० हजार ८१० रुपयांचे सोन्याचे दागिने, ५ लाख रुपयांची रोकड तर २१ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल असा मिळून २५ लाख ३१ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता.
सदर दागिने फिर्यादी महिलांच्या स्वाधीन करण्याचा कार्यक्रम भार्इंदरच्या मॅक्सस सभागृहात १ जानेवारी रोजी झाला. चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम, काटकर, महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, उपअधिक्षक नरसिंह भोसले, पोलीस अधिकारी - कर्मचारी, नगरसेवक, महिला दक्षता समिती व शांतता समितीचे सदस्य, पोलीस मित्र सह नागरिक उपस्थित होते.
चोरी - घरफोडी या मुख्य प्रश्नांसह गृहनिर्माण संस्थांमधील वादाचा विषय मोठा आहे. आपण उपनबिंधकांना दर महिन्यास हाऊसिंग अदालत घेण्यास सांगू जेणे करुन वाद सामोपचाराने सुटेल तसेच पोलिसांवरील ताण कमी होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. पोलिसांची संख्या कमी असुन त्यांच्यावर विविध कामांचा प्रचंड ताण आहे. तरी देखील ठाणे ग्रामीण पोलिसांनी हातभट्टी दारू बंदीचं राज्यात मोठं यश मिळवलं आहे.
कौशल्य विकास योजनेचं केंद्र ११ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरु होत आहे. शासनाच्या वेगवेगळ्या सुविधांसाठीच्या अ‍ॅप करीता जनजागृती साठी निधी देऊ. द्रोण खरेदीसाठी निधी दिल्याने त्या सहाय्याने पोलिसांनी हातभट्या नष्ट केल्या. शिवाय मान्यता प्राप्त मद्य विक्री वाढुन उत्पादन शुल्कात वाढ झाली, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
सोनसाखळी चोरी करणारे आरोपी विमानातुन यायचे व दिल्लीला पळुन जायचे. दोन मोठ्या टोळ्या ह्या दिल्ली वरुन पकडल्या. एकट्या उत्तर प्रदेश मधुन ११ लाखांचे चोरीचे दागिने हस्तगत केले. सीसीटीव्ही फुटेजमुळे या दोन्ही टोळ्यांना पकडण्यात यश आले.
पोलिसांचा सर्वे झाला असून महापालिकेने लवकरात लवकर शहरात सीसीटीव्ही लावावेत अशी अपेक्षा डॉ. महेश पाटील यांनी बोलुन दाखवली. ५० ते ६० टक्के गुन्हे सीसीटीव्ही मुळे उघकीस आणण्यात मदत होत आहे. गणेशपुरी येथे फायरींग व दरोडयाचा गंभीर गुन्हा सुध्दा सीसीटीव्ही मुळे उघड झाला. सीसीटीव्हीचे महत्व पाहता आठवड्याला दहा सीसीटीव्ही तरी लावण्याचा निश्चय करा.
९० टक्के हातभट्टी दारु विक्री बंद झाली असुन पासपोर्ट, भाडेकरु ठेवणे तसेच तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांनी आॅनलाईन सेवा सुरु केली आहे. आॅनलाईन सुविधांचा नागरीकांना जास्तीजस्त वापर करावा. या मुळे होणारा विलंब टळुन लोकांचा वेळ वाचत आहे. काही लोकांचा गैरप्रकार पण बंद झाले. अमली पदार्थ मुक्त मीरा भार्इंदरसाठी नागरीकांनी सहकार्य करावे. अमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती कळवा तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल असे पाटील म्हणाले.
पोलिस कॉलनीसाठी बेवर्ली पार्क येथे भूखंड असून ५०० सदनिका उपलब्ध होणार आहे. त्याचे काम लवकर सुरु व्हावे अशी आशा
पाटील यांनी व्यक्त केली.

मेहतांचे पोलीस आमच्याकडे नाहीत
आपल्या कडच्या पोलिसांना चोरी व्हायच्या दोन दिवस आधीच माहिती असते, असा चिमटा विनोदाच्या माध्यमातून नरेंद्र मेहता यांनी पोलिसांना काढला . त्यावर डॉ. महेश पाटील यांनी, मेहतांचे पोलीस आमच्याकडे नाहीत असे सुनावले. पण गुन्हा झाल्यावर लगेच त्याची उकल करणे, तपास करणे, आरोपी पकडणे व परिणामकारक कारवाई करणे ते पोलीस माझ्याकडे आहेत.

आपका एरीया मालामाल है !
अमली पदार्थ मुक्त शहरची मोहिम हाती घेतल्या बद्दल पोलिसांचे कौतुक करतानाच त्याच्यासाठी लागणारी विविध यंत्रणा, सुधार केंद्र आदिसाठी निधी देऊ असे जिल्हाधिकारी म्हणाले. पर सब बोलते है की आपका एरीया मालामाल है, असा टोला त्यांनी शेजारी बसलेल्या आ. नरेंद्र मेहतांना लगावला. पोलिसांना अमली पदार्थ विरोधी मोहिमेत आवश्यक यंत्रणांसाठी निधी दिला पाहिजे असे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी त्यांना दाद दिली. 

Web Title: District Collector urges to start Housing Court to resolve disputes between housing societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे