तिकीट निम्मं असुनही भार्इंदर - ठाणे शिवशाहीला प्रतिसाद कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 02:08 PM2018-02-16T14:08:36+5:302018-02-16T14:08:42+5:30

एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत.

Despite the ticket being Bharatinder - Thane Shivsahi has fewer responses | तिकीट निम्मं असुनही भार्इंदर - ठाणे शिवशाहीला प्रतिसाद कमीच

तिकीट निम्मं असुनही भार्इंदर - ठाणे शिवशाहीला प्रतिसाद कमीच

Next

मीरारोड - एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत. मधले प्रवाशी न घेणे, मधले थांबे नसणे, वाहक नसणे या मुळे तिकीट दर कमी असुन देखील प्रवाशी मिळत नसल्याची कारणं समोर आली आहेत.
एसटी महामंडळाने ठाणे - भार्इंदर - ठाणे अशी शिवशाही वातानुकुलीत बस ११ फेब्रुवारी पासुन सुरु केलेली आहे. भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर एसटी बस स्थानक असुन येथुन ठाणे एसटी स्थानकसाठी बस सुटतात. या बसचे भार्इंदर - ठाणे भाडे अवघे ४८ रुपये इतके आहे. परंतु सदर बस मध्ये वाहक नसुन भार्इंदर वरुन ठाणे असे तिकीट बस मध्ये बसण्या आधीच घ्यावे लागते. सदर बस ही कापुरबावडी, माजीवडा , कोर्टनाका या तीनच ठिकाणी उतरणारया प्रवाशांसाठी थांबते. वाहकच नसल्याने मधुन प्रवाशी घेतले जात नाहीत.
एसटीच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शिवशाहीच्या ८ बस या मार्गावर देण्यात आल्या असुन एका बसच्या तीन फेरया या प्रमाणे रोज २४ फेरया व्हायला हव्या. पण प्रत्यक्षात मात्र रोजच्या जेमतेम १२ ते १५ फेरयाच होत आहे. त्यातच शिवशाही ही भार्इंदर वरुन सुटली की थेट कापुरबावडी, माजीवडा, कोर्ट नाका व ठाणे स्थानक येथेच थांबते. त्यामुळे भार्इंदर पश्चिम पासुन काशिमीरा नाका पर्यंत चढणारे मोठ्या संख्येने असलेले प्रवाशीच बसला मिळत नाहीत. तशीच गत पुढे देखील होते. बसला मध्ये थांबे नसल्याने वाहक दिलेली नाही.
परिणामी सकाळी गर्दीच्या वेळात दोन - चार बसच पुर्ण भरुन सुटतात. तेही बस भरण्यासाठी एसटी कर्मचारी प्रवाशांना आग्रह करताना दिसतात. नंतरच्या बस मध्ये जेमतेम २० - २५ प्रवाशीच मिळतात. बस भरे पर्यंत बराच वेळ जात असल्याने बहुतांश प्रवाशी आपला लालडबाच बरा म्हणतात.
वास्तविक साध्या एसटी बस वाटेतली स्थानकं घेत ठाण्याला जात असल्याने या बसना नेहमी गर्दी असते. एसटीचा हा फायद्यात चालणारा बस मार्ग मानला जातो.
भार्इंदर स्थानक बाहेरुन एमबीएमटीच्या देखील ठाणे कोपरीर् साठी बस सुटतात. यात साध्या तसेच वॉल्वो बसचा समावेश आहे. भार्इंदर ठाणे मार्गेवर पालिकेच्या फक्त दोन वॉल्वो बस धावत असुन त्यांच्या साधारण ८ फेरया होतात. पालिकेच्या सदर वॉल्वोचे तिकीट हे १०० रुपये इतकं आहे. पण ही बस देखील प्रमुख थांबे घेत जाते. एसटीच्या शिवशाहीचे दर पालिका बस पेक्षा निम्मे असले तरी अजुन तरी प्रवाशी वा उत्पन्नावर परिणाम झाला नसल्याचे एमबीएमटीच्या सुत्रांनी सांगीतले.

Web Title: Despite the ticket being Bharatinder - Thane Shivsahi has fewer responses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.