अत्याचारी आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भिवंडीत पद्मशाली समाजाचा मुक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 08:36 PM2018-09-25T20:36:54+5:302018-09-25T20:41:57+5:30

The demand for the execution of the accused accused in the case of the Padmashali community of Bhiwandi, | अत्याचारी आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भिवंडीत पद्मशाली समाजाचा मुक मोर्चा

अत्याचारी आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भिवंडीत पद्मशाली समाजाचा मुक मोर्चा

Next
ठळक मुद्देदहा वर्षाच्या मुलीवर केला अत्याचारपद्मानगर मधून मोर्चास सुरूवातखटला द्रुतगती न्यायालयांत चालविण्याची मागणी

भिवंडी: अहमदनगर येथील तेलुगू समाजातील दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या व आरोपीला पाठीशी घालणाºया सहकाºयांचा निषेध करीत त्यांना फाशीची शिक्षा करावी,या मागणी साठी शहरातील अखिल पद्मशाली समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य मुक मोर्चा काढण्यात आला होता.
शहरातील पद्मानगर येथील तेलुगू समाज हॉलपासून या मोर्चास सुरूवात झाली.ही मोर्चा धामणकरनाका, कल्याणरोड मार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला.
अहमदनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पोलीसांनी अफसर लतीफ सय्यद यास अटक केली आहे. तो अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन त्याला फाशीची शिक्षा द्यावी तर त्याला मदत करणाºयांवर व पिडीतांच्या कुटूंबावर दबाव टाकणाºयांना सह आरोपी करावे. हा खटला द्रुतगती न्यायालयांत चालविण्यात येऊन अ‍ॅड.उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी.पिडीत कुटूंबाला २५ लाखाची आर्तिक मदत द्यावी, पिडीत मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करून तीला शासकीय नोकरीची हमी द्यावी.तसेच पिडीत मुलीला उच्च दर्जाची वैद्यकीय मदत मिळावी तसेच पिडीत मुलीच्या कुटूंबास संरक्षण मिळावे,अशी मागण्याचे निवेदन प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांना देऊन समस्त तेलुगू समाजातर्फे या घटनेचा निषेध केला. या प्रसंगी अखिल पद्मशाली समाजाचे अध्यक्ष येमुल नरसय्या,कार्याध्यक्ष पुरषोत्तम कुंदेन,महासचीव राजू गाजेंगी,आमदार महेश चौघुले,आ.रूपेश म्हात्रे, नगरसेवक सुमित पाटील,भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शेट्टी, पुरषोत्तम वंगा, मोहन वल्लाळ यांच्या सह महिलावर्ग उपस्थित होते. मोर्चात तेलुगू समाजाच्या महिलांसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: The demand for the execution of the accused accused in the case of the Padmashali community of Bhiwandi,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.