अपहरण केलेल्या दोन मुलींसह तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 11:46 PM2017-11-08T23:46:38+5:302017-11-08T23:47:06+5:30

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने पनवेल (नवी मुंबई) मधून अटक केली आहे.

Delivering three of the kidnapped girls, along with their betrayal, were laughing | अपहरण केलेल्या दोन मुलींसह तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल

अपहरण केलेल्या दोन मुलींसह तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल

Next

ठाणे : अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने पनवेल (नवी मुंबई) मधून अटक केली आहे. या तिन्ही मुलांना तसेच त्यांचे अपहरण करणाºया दोघांना अशा पाच जणांना बुधवारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून दोन अल्पवयीन मुली आणि तीन मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी दाखल झाला. ही मुले मुंबई परिसरात असल्याची माहिती कैम्पियरगंज (उत्तर प्रदेश) पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मृत्युंजयकुमार पांडेय यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे या अपहरण प्रकरणात मदतीची मागणी केली. त्यानुसार, गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला ही मदत करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिले होते. आपल्या खब-यांच्या आधारे तसेच मोबाइल टॉवरच्या माध्यमातून ही मुले पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील बांधकाम साइटवर असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. ते पनवेलच्या कच्छी मोहल्ला भागात असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर या मुलांना ८ नोव्हेंबर रोजी ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्यापैकी प्रद्युम्न ऊर्फ विद्यासागर मोहनलाल निषाद (२१) हा गेल्या तीन वर्षांपासून पनवेल येथे सेंट्रिंगचे काम करत होता. तो अधूनमधून त्याच्या सोनौरा (जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) या गावी जात होता. त्याच काळात त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले. तसेच त्याचा मित्र अखिलेश जनार्दन निषाद (१९) याचेही त्याच गावातील अन्य एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. प्रद्युम्न आणि अखिलेश यांनी आपसात संगनमत करून या गावातील दोन मुली आणि त्यांच्यापैकी एका मुलीचा १६ वर्षांचा भाऊ यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून ३१ आॅक्टोबर रोजी त्यांचे अपहरण करून त्यांना पनवेलच्या कच्छी मोहल्ला भागातील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये आणून ठेवले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कैम्पियरगंजचे उपनिरीक्षक मृत्युंजयकुमार पांडेय आणि त्यांच्या पथकाच्या ताब्यात या पाचही मुलांना बुधवारी दिले.

Web Title: Delivering three of the kidnapped girls, along with their betrayal, were laughing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा