दोघांचा अपघाती मृत्यू, एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:28 AM2018-06-18T03:28:05+5:302018-06-18T03:28:05+5:30

विजयनगर परिसरात राहणाऱ्या तन्मय चव्हाण आणि मयूर काळे या दोघा तरुणांचा नवी मुंबईतील सानपाडा येथे रविवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला.

Death of both of them, one's suicide | दोघांचा अपघाती मृत्यू, एकाची आत्महत्या

दोघांचा अपघाती मृत्यू, एकाची आत्महत्या

Next

कल्याण : येथील पूर्वेकडील विजयनगर परिसरात राहणाऱ्या तन्मय चव्हाण आणि मयूर काळे या दोघा तरुणांचा नवी मुंबईतील सानपाडा येथे रविवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने विजयनगरवर शोककळा पसरली आहे. दुसºया एका घटनेत पूर्वेकडीलच चिंचपाडा भागात राहणाºया मंगेश शिर्के याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होते.
तन्मय चव्हाण हा अशोकवन, तर मयूर काळे हा मयूरेश सोसायटीत राहायचा. दोघेही नुकतेच पदवीधर झाले होते. शनिवारी रात्री हे दोघेही मित्र मोटारसायकलवरून सानपाडा येथे फिरायला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या गाडीला सानपाड्यातच टेम्पोची जोरदार धडक बसली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याची माहिती मिळते. अपघाताचे वृत्त सकाळी विजयनगर परिसरात येताच एकच शोककळा पसरली. स्थानिक नगरसेविका माधुरी काळे आणि प्रशांत काळे यांनी दोघांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. दोघांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.
या दोघांवर रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विठ्ठलवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मित्र, आप्तेष्ट मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
>गळफास घेऊन आत्महत्या
शनिवारी रात्री चिंचपाडा गावात राहणाºया मंगेश वामन शिर्के या विवाहित तरुणाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Death of both of them, one's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.