Video - ठाण्यातल्या खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 02:00 PM2019-06-13T14:00:58+5:302019-06-13T14:12:25+5:30

ठाण्यातील खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच पडला आहे. खिडकाळेश्वर मंदिर तलाव, प्रभाग क्रमांक 29 या भागातील तलावातील माशांचा मृत्यू झाला आहे.

dead fish found floating in khidkaleshwar temple pond | Video - ठाण्यातल्या खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच

Video - ठाण्यातल्या खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच

Next
ठळक मुद्देठाण्यातील खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच पडला आहे. खिडकाळेश्वर मंदिर तलाव, प्रभाग क्रमांक 29 या भागातील तलावातील माशांचा मृत्यू झाला.तलावात फिल्टरेशन प्लान्ट बंद असल्यामुळे आणि  केमिकल पाण्यात आल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

ठाणे - ठाण्यातील खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच पडला आहे. खिडकाळेश्वर मंदिर तलाव, प्रभाग क्रमांक 29 या भागातील तलावातील माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहे. तलावात फिल्टरेशन प्लान्ट बंद असल्यामुळे आणि  केमिकल पाण्यात आल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (13 जून) खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच आढळला आहे. खिडकाळेश्वर मंदिर तलावात दशक्रिया विधी, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असतात. तसेच तलावाची साफसफाई करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने यावर वेळीच उपाय योजना न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे. 

Web Title: dead fish found floating in khidkaleshwar temple pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.