धरणाचे पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरोधात गुन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:40 AM2018-05-22T06:40:19+5:302018-05-22T06:40:19+5:30

बरनाथमधील अधिकारी कार्यालयातून प्रभागातदेखील येत नाहीत. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्यानेच शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

Crimes against factories damaging dam water? | धरणाचे पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरोधात गुन्हे?

धरणाचे पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरोधात गुन्हे?

Next

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि चिखलोली धरणाच्या दूषित पाण्याबाबत नियोजन करण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी काढलेला अंबरनाथ दौरा चांगलाच गाजला. आढावा बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. तर, दुसरीकडे चिखलोली धरणाची पाहणी करण्यासाठी गेलेले मंत्री खोत यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना थेट कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
चिखलोली धरणाच्या पाण्यातील प्रदूषणाचे वाढलेले प्रमाण आणि अंबरनाथ पश्चिम भागात दूषित पाणी पिऊन अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची पाहणी करण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा योजनेची माहिती घेतली. तसेच चिखलोली धरणाची पाहणी केली. धरणात शेवाळाचे आणि रासायनिक द्रव्यांचे वाढलेले प्रमाण यामुळे या धरणातील पाणी नागरिकांसाठी धोकादायक आहे. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल आल्याने पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे.
धरणातील प्रदूषणाबाबत ठोस निर्णय घेताना खोत यांनी अधिकाºयांना लागलीच कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. धरणाच्या पात्रात जे रासायनिक कारखाने आहेत, त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले. तसेच हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी घेण्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत. धरणाचा पाहणी दौरा संपल्यावर खोत यांनी दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.
स्वामी समर्थ सभागृहात झालेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाणीसमस्येवर बोलताना सर्वात आधी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी शहरातील पाणीसमस्या नेमकी काय आहे, याची जाणीव खोत यांना करून दिली. पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी मंत्रीमहोदय हे मुंबईहून अंबरनाथला येतात. मात्र, अंबरनाथमधील अधिकारी कार्यालयातून प्रभागातदेखील येत नाहीत. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्यानेच शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. २०१३ ची वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यालादेखील जीवन प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकाºयांनी काही मोजक्या बांधकाम व्यावसायिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या सर्व बाबींची माहिती घेतल्यावर खोत यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. यानंतर फुलेनगरमधून बबन तांबे, जावसईमधून वसंत पाटील, बुवापाडातून निखिल वाळेकर, मनोज सिंह, सुरेंद्र यादव, शशांक गायकवाड यांनीदेखील या परिसरातील पाणीसमस्येवर आपले मत व्यक्त केले. पूर्व भागातील गढूळ पाण्याबाबत नगरसेवक राजू शिर्के, सुभाष साळुंखे, अनिता भोईर, रागिनी पवार, रोहिणी भोईर यांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या. समस्यांचा पडलेला पाऊस आणि अधिकाºयांविषयी निर्माण झालेली नाराजी पाहिल्यावर खोत यांनी यासंदर्भात लागलीच मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अपूर्ण राहिलेली योजना पूर्ण करण्यासंदर्भात योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले.
बदलापुरातील काही बांधकाम व्यावसायिकांनीदेखील नव्या जोडणीबाबत अधिकाºयांना निवेदन दिले. बदलापुरात बांधकाम व्यावसायिकांना नवीन कनेक्शन देताना अडवणूक होत असल्याचा आरोप शंकर भोईर यांनी असून त्यावर मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: Crimes against factories damaging dam water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण