कच-यावरून प्रशासनाची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 03:21 AM2017-08-17T03:21:18+5:302017-08-17T03:21:21+5:30

शहरातील साफसफाईचे नियोजन कसे करणार, असा सवाल उपस्थित करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारच्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरले.

Contradiction can lead to administration | कच-यावरून प्रशासनाची कोंडी

कच-यावरून प्रशासनाची कोंडी

Next

कल्याण : कचरा उचलण्याची दैनंदिन कामेही योग्य प्रकारे होत नसल्याने उत्सवाच्या काळात शहरातील साफसफाईचे नियोजन कसे करणार, असा सवाल उपस्थित करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारच्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरले. तर, बेकायदा बांधकामांना प्रभाग अधिकारी भारत पवार पाठीशी घालत असल्याप्रकरणी जाब विचारण्यात आला. हा मुद्दा उपस्थित करणाºया शिवसेना पक्षाच्या सहयोगी नगरसेविका सोनी अहिरे यांचे प्रशासनाच्या खुलाशावर समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला. या वेळी त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांनाही लक्ष्य करत अधिकाºयांना पाठीशी घालता, असा आरोप केला. पवार यांच्यावर ठोस कारवाई न झाल्यास पुढील महासभेत उपोषणाला बसेन, असा इशाराही सोनी यांनी दिला.
शिवसेना नगरसेविका छाया वाघमारे यांनी त्यांच्या प्रभागात योग्य प्रकारे कचरा उचलला जात नसल्याचा मुद्दा औचित्याच्या आधारे उपस्थित केला. या वेळी वैजयंती गुजर-घोलप आणि दीपेश म्हात्रे यांनीही प्रभागातील कचरा उचलला जात नाही, हे वास्तव असल्याकडे लक्ष वेधले. कामगारांची नियुक्ती केवळ कागदावरच दिसते. परंतु, रस्त्यावर दिसत नाही. या कामगारांअभावी खाजगी कर्मचारी प्रभागात साफसफाईसाठी नेमल्याची माहिती नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिली. सफाई कामगारांच्या मुलांना वारसा हक्काने नोकरी मिळते. परंतु, ही मुले शिक्षित असल्याने सफाईचे काम करायला तयार होत नाहीत. ते दुसरीकडे काम करतात, हे चित्र इतरत्रही सर्रास पाहायला मिळत असल्याचा मुद्दा घोलप यांनी मांडला.
सकाळी १० वाजल्यानंतर एकही महिला कामगार सफाईचे काम करताना दिसत नाही. काही कामगार तर चारचाकी वाहने घेऊन कामावर येतात, याकडेही काही नगरसेवकांनी लक्ष वेधले. सार्वजनिक आरोग्य अधिकारी मधुकर शिंदे आणि विलास जोशी यांच्याकडील पदभार काढून घ्या. त्यांच्याकडे हप्ता घेऊन काम न करणाºया कामगारांची यादीही देण्यात आली आहे. परंतु, त्याकडे त्यांचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
प्रभाग कमी, त्या ठिकाणी घंटागाड्या अधिक दिल्याचेही नगरसेवक म्हणाले. यावर कचºयाच्या गाड्या कमी असून लवकरच ४० घंटागाड्या आणि १६ आरसी गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. तर, कामगारांची संख्या पाहता ५०० अतिरिक्त मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नेमण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. परंतु, त्यांच्या माहितीवर नगरसेवकांचे समाधान न झाल्याने आयुक्त वेलरासू यांनी स्पष्टीकरण दिले. साफसफाई होत नाही, ही वस्तुस्थिती असल्याची कबुली देत आयुक्तांनी वाढत्या लोकसंख्येच्या मानाने कर्मचाºयांची संख्याही वाढणे गरजेचे असल्याचा मुद्दा सभागृहात मांडला. उत्सव काळात लक्ष दिले जाईल असे म्हणाले.
>प्रभाग अधिकाºयाचे अभय
आय प्रभागाचे अधिकारी भारत पवार हे बेकायदा बांधकामांना अभय देत असल्याचा मुद्दा नगरसेविका सोनी अहिरे यांनी सभागृहात उपस्थित केला. पवार यांची कारवाई दिखाऊ असून सायंकाळनंतर ते विकासकांना घेऊन कार्यालयात बसतात. त्यांच्यावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी सोनी यांनी लावून धरली. पवार हे आमदारांचे बंधू असल्याने त्यांच्यासारख्या लिपिकाला हे पद दिले आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या वेळी भाजपाचे नगरसेवक राहुल दामले यांनीदेखील प्रशासनावर चांगलीच झोड उठवली. आजच्या घडीला प्रशासनाने दुय्यम दर्जाचे अधिकारी नेमून प्रभाग अधिकारीपदाची शोभा केली आहे. नगरसेविका रेखा चौधरी यांनीही पवार यांना एका बांधकामावरील कारवाईच्या वेळी काही नागरिकांकडून धक्काबुक्की झाली, याबाबत सांगूनही याप्रकरणी त्यांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नसल्याचे सांगितले. प्रभाग अधिकारी या पदावर सहायक आयुक्त दर्जाचा अधिकारी बसवणे गरजेचे असताना प्रतिनियुक्तीवर आलेले नितीन नार्वेकर आणि मिलिंद धाट यांच्याकडे प्रभाग अधिकाºयांची जबाबदारी का सोपवली जात नाही, असा सवालही नगरसेविका वैजयंती घोलप यांनी केला. दरम्यान, पवार यांच्या मुद्यावरून त्यांना सभागृहात हजर करा, अशी मागणी सोनी यांनी केली. याला भाजपाच्या नगरसेविकांचाही पाठिंबा मिळाला. याला महापौरांनी नकार देताच संबंधितांनी महापौरांना लक्ष्य केले. मात्र, पवार यांची चौकशी करून कारवाई करू, हे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर वाद शमला.

Web Title: Contradiction can lead to administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.