लाच घेतल्याप्रकरणी प्रांत कार्यालयात स्वीय सहाय्यकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 09:30 PM2018-11-21T21:30:06+5:302018-11-21T21:32:26+5:30

भिवंडी : चौदा लाख रु पयांची लाच स्विकारल्या प्रकरणी भिवंडी प्रांत कार्यालयातील स्वीय सहाय्यक सुनील कांबळे याच्यावर बुधवारी सकाळी ...

In connection with the bribe, the Swedish Assistant arrested in the province's office | लाच घेतल्याप्रकरणी प्रांत कार्यालयात स्वीय सहाय्यकास अटक

लाच घेतल्याप्रकरणी प्रांत कार्यालयात स्वीय सहाय्यकास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देरक्कम स्विकारताना सुनील कांबळेस रंगेहाथ पकडलेप्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांची रात्रभर चौकशीशेतजमीनीचा फेरफार रद्द करण्याकामी केली पैश्याची मागणी

भिवंडी: चौदा लाख रु पयांची लाच स्विकारल्या प्रकरणी भिवंडी प्रांत कार्यालयातील स्वीय सहाय्यक सुनील कांबळे याच्यावर बुधवारी सकाळी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांची रात्रभर चौकशी करून त्यांना सकाळी सोडून दिले आहे.
तालुक्यातील अस्नोली येथील शेतजमीनी बाबतचा फेरफार रद्द करण्याकामी तसेच अपील केसचा निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी प्रांत कार्यालयातील स्वीय सहाय्यक सुनिल कांबळे याने तक्रारदार डॉ.वसंत दत्तात्रय पाटील यांच्याकडून १५लाख रूपयांची लाच मागीतली. त्यासाठी गेले महिनाभर हे प्रकरण प्रांत कार्यालयांत सुरू होते. या प्रकरणी तडजोडीअंती तक्रारदार पाटील यांच्याकडून १४ लाख घेण्याचे मान्य केले. तेंव्हा वसंत पाटील यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उप अधीक्षक सावंत यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या पथकाने प्रांत कार्यालयात सापळा रचला आणि हि रक्कम स्विकारीत असताना स्वीय सहाय्यक सुनील कांबळे यास रंगेहाथ पकडले .या कारवाई मंगळवारी सायंकाळी कार्यालयीन वेळेत झाल्यानंतर कार्यालयात उपस्थित असलेले प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रात्रभर थांबवून त्यांची व स्टेनो सुनील कांबळें या दोघांची सखोल चौकशी केली.त्यानंतर बुधवारी सकाळी साडेसात वाजता शांतीनगर पोलीस ठाण्यात स्टेनो सुनिल कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली.

Web Title: In connection with the bribe, the Swedish Assistant arrested in the province's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.