Congress Protest against government | केंद्र सरकारने जाहिर केलेल्या अर्थसंकल्पाविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन 
केंद्र सरकारने जाहिर केलेल्या अर्थसंकल्पाविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन 

ठाणे - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्प, पेट्रोल आणि डिझेलदरवाढ, महागाई या पार्श्वभूमीवर राज्य-केंद्र सरकारच्या निषेध करण्यासाठी ठाणे शहर(जि.)काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी (2 फेब्रुवारी) शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी आपआपल्या गाड्यांना ढकलत नेऊन आंदोलन केले. शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुमन अग्रवाल, तारिक फारूकी, प्रदेश काँग्रेस सचिव के.वृषाली, माजी महापौर नईम खान, परिवहन समिती सदस्य सचिन शिंदे, जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश ठाणेकर, बी.एन.सिंग, प्रभाकर थोरात आदी मान्यवर सहभागी झाले होते.

याप्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात गाडी ओढत नेली,तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी आपली मोटरबाईक हाताने ढकलत सहभागी झाले होते. महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने यांच्यासह अनेक महिलादेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शहर काँग्रेस सरचिटणीस रविंद्र कोळी, महेंद्र म्हात्रे, विजय बनसोडे ब्लॉकअध्यक्ष शैलेश शिंदे, संदीप शिंदे, हिन्दुराव गळवे, बाबू यादव, रमेश इंदिसे, चंद्रकांत मोहीते, मार्शल पन्हाळकर, अजिंक्य भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी मुकादम मॅडम यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले.


Web Title: Congress Protest against government
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.