काँक्रिटचा रस्ता चक्क तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:58 AM2019-06-15T00:58:01+5:302019-06-15T00:58:09+5:30

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ : पालिका, एमएमआरडीएची बघ्याची भूमिका

The concrete route broke quite a bit | काँक्रिटचा रस्ता चक्क तोडला

काँक्रिटचा रस्ता चक्क तोडला

Next

मीरा रोड : एमएमआरडीएने बांधण्यास घेतलेल्या घोडबंदर - जेसलपार्क काँक्रिट रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील काही रस्ता चक्क पोकलेनच्या मदतीने तोडण्यात आल्याचा प्रकार घडला असताना महापालिका व एमएमआरडीने केवळ बघ्याची भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ चालवली आहे. रस्ता तोेडतानाचे छायाचित्रण समोर आले असून जागेवर उभे राहून रस्ता तोडायला लावणारी व्यक्ती भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या कार्यालयातील आहे.

विकास आराखड्यातील काशिमीरा महामार्गावरील सगणाई देवी मंदिरापासून अदानी वीज उपकेंद्रापर्यंतच्या जेसलपार्क - घोडबंदर रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम एमएमआरडीएने केले आहे. ६० मीटर रूंद असलेल्या या काँक्रिट रस्त्यासोबत मोठा नाला व गटार आहे. या रस्त्याची लांबी पावणे दोन कि.मी. असून यासाठी ५५ कोटींचा खर्च होणार आहे. हे काम एमएमआरडीएने एनजी कंस्ट्रक्शन कंपनीस दिले आहे. याच मार्गावर मेहतांचा उत्तुंग इमारतींचा प्रकल्प तसेच अन्य काही बिल्डरांचे मोठे प्रकल्प आहेत.
रस्ता व नाल्याचे काम सुरू असून दोन दिवसांपूर्वीच येथील एक बाधित बंगला तोडण्यात आला. त्याआधी एक जुना तबेला पालिकेने पोलीस व बाऊंसरच्या बंदोबस्तात तोडला होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी रवी भांगरे याने पडिक बांधकामा मागील नव्याने बनवलेला काँक्रिट रस्ता पोकलेनच्या मदतीने तोडून टाकायला लावला. पोकलेनला ब्रेकर लाऊन नुकताच बांधलेला रस्ता तोेडण्याचे काम रवी करवून घेत असल्याचे पाहून कंत्राटदाराच्या माणसांनी रवीला रस्ता का तोडताय म्हणून विचारणा केली. त्यावर रवीने आयुक्तांनी सांगितले तरी आपण थांबणार नाही. सरांनी सांगितले तरच ऐकू असे सांगत कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. रवी हा मेहतांच्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. छायाचित्रण करणाºया एकाचा मोबाइलही हिसकावून घेण्यात आल्याचे कमरचाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुमारे ५० फूट रस्ता तोडण्यात आला असून दोन ठिकाणी हा प्रकार झाला आहे. या घटनेनंतर बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाºयांनी घटनास्थळी जमले होते. त्यांनी मेहतांचा निषेध केला.

अधिकाºयांचा बोलण्यास नकार
एमएमआरडीचे उपअभियंता प्रशांत वाकोडकर शुक्रवारी घटनास्थळी आले होते. परंतु त्यांनी या बद्दल बोलण्यास नकार दिला. एमएमआरडीएचे अधिकारी नारकर यांच्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर वरिष्ठ अधिकारी कवठणकर यांनीही संबंधितांकडून प्रतिक्रिया घेऊन देतो असे सांगून बोलणे टाळले. त्यामुळे हे प्रकरण वादात सापडणार असे बोलले जात
आहे.

या रस्त्याचे काम एमएमआरडीएचे असून गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी त्यांची असल्याचे म्हटले. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मोबदला पालिके देते. काम सुरू झाले तेव्हा कुणी का हरकत घेतली नाही.
- बालाजी खतगावकर, आयुक्त.

रस्ता तोडण्यात आपला काही संबंध नसून तबेलाचालक आणि जमीनमालक यांच्यापैकी मोबदला कुणाला द्यायचा हा प्रश्न आहे. या वादातून जमीनमालकाने रस्ता नको म्हणून तो तोडला आहे. हा रस्ता व्हावा म्हणून बाधित बांधकामे काढण्यास आपणच सहकार्य केले आहे. - नरेंद्र मेहता, आमदार

Web Title: The concrete route broke quite a bit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे