मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले ठोस निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 04:37 PM2019-01-23T16:37:56+5:302019-01-23T16:38:09+5:30

मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण आणि रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत

Concrete decision taken for development of Maratha community - Chief Minister Devendra Fadnavis | मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले ठोस निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले ठोस निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

ठाणे  - मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण आणि रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, न्यायालयात देखील लढा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. 

माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कार समारोहप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. घणसोलीच्या सेक्टर ७ मधील सिम्प्लेक्स कॉमन मैदान येथे काल सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदींची उपस्थिती होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, ''युवकांना बँकांनी कर्जे दिलीच पाहिजेत, बँकांचे काही प्रश्न असतील पण समाजाच्या युवकांसाठी शासन प्रयत्न करीत असून बँकांनी सहकार्य केलेच पाहिजे. यासाठी युवकांनी देखील बँकांवर दबाव वाढविला पाहिजे.''  वडाळा येथील घरांचा प्रश्न सुटला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,''सिडकोच्या घरांमध्ये देखील माथाडीना घरे राखून ठेवली आहेत. घणसोली येथील सिम्प्लेक्स वसाहतीचा क्लस्टर पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न कसा करता येईल हे पाहण्यासाठी लवकरच एक बैठकही आयोजित करण्यात येईल. नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांचे सर्व्हेक्षण सिडकोच्या माध्यमातून करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे क्लस्टर तसेच घरांच्या विकासास गती येईल अशी माहितीही त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीचा संदर्भ देऊन दिली. माथाडीच्या संघटनेत आम्हाला राजकारण आणायचे नाही. नरेंद्र पाटील हे खूप संवेदनशील आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Web Title: Concrete decision taken for development of Maratha community - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.