ठाण्यात घुमला शाहिरांचा आवाज, शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 04:16 PM2019-01-29T16:16:37+5:302019-01-29T16:23:32+5:30

शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न झाला. यावेळी ठाण्यात तमाम शाहीरांचा आवाज घुमला.

Completed in the Shahiri Folk Art Festival 2019 | ठाण्यात घुमला शाहिरांचा आवाज, शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न

ठाण्यात घुमला शाहिरांचा आवाज, शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न

Next
ठळक मुद्देठाण्यात घुमला शाहिरांचा आवाजशाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न या महोत्सवात शाहिरांचे पोवाडे, लोकगीते, लावणी, लोकनृत्ये व कोळीनृत्य

ठाणे: कला, साहित्य, संस्कृती आदी क्षेत्रांत लोकप्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठान व शिवसेना सावरकर नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्याच्या सावरकर नगर येथील शाळा क्र. १२० च्या मैदानाता ‘शाहिरी लोककला महोत्सव २०१९’ हा रसिकांच्या तुफान गर्दीत, तरुणाईच्या जल्लोषात आणि टाळ््या- शिट्ट्यांच्या आवाजात संपन्न झाला. धमर्वीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त या महासोहळ््याचे आयोजन केले होते.
        या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांचे पोवाडे, लोकगीते, लावणी, लोकनृत्ये व कोळीनृत्यांनी ठाणेकर रसिकांची मने जिंकली. नृत्यांगना पौर्णिमा सुयर्वंशी, विनोदवीर विकास थोरात, विनोदवीर डॉ. प्रमोद नलावडे, अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी, अभिनेत्री माधवी जुवेकर, नमनकार अशोक दुदम, अभिनेते विजय कदम, नृत्यांगना श्रीकला हट्टंगडी, महिला शाहीर धनश्री पवार, अभिनेते सुनील गोडसे, कॅसेटकिंग छगन चौगुले आणि इतर नामवंत कलाकारांच्या सहभागाने कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्यावतीने ११ मान्यवरांना लोकगौैरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या सोहळ््यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी महापौर प्रेमसिंग रजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण व इतर उपस्थित होते. महोत्सवाचे संकल्पना व दिग्दर्शन विनोद नाखवा यांचे तर महोत्सवाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अद्यक्ष मधुसुदन सुगदरे व अध्यक्ष रमेश नाखवा यांचे होते.
लोककलेच्या दिंडीने सुरू झालेला हा महोत्सव लोककलेच्या विविध सादरीकरणांनी पार पडला. गणेश वंदना झाल्यावर शाहिर शांताराम चव्हाण यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताला, शाहीर अर्जुन अटाळीकर यांच्या नारीला द्या सन्मान या लोकगीताला व शाहीर रमेश नाखवांच्या एकविरा देवीच्या गीताला रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत मराठी पाऊल पडते पुढे या नृत्यमय गीताने कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाहीर दत्ता ठुले यांच्या आदिवासी लोकगीताने आणि शाहीर निलेश जाधव यांच्या संभाजी महाराजांवरील पोवाड्याने रसिकांना ताल धरायला लावला तर राजेश सुतार यांनी आई तुझं देऊळ हे गीत सादर केले. महिला शाहिर धनश्री पवार हिने शिवाजी महाराजांवरील सादर केलेला पोवाडा रसिकांच्या हृदयाला भिडला तर लोककलावंत छगन चौगुले यांनी आपले नवरी नटली हे स्वत:चे गाजलेले लोकगीत सादर केले व रसिकांना ठेका धरायला लावला. विनोद नाखवा यांच्या संकल्पनेतून साकारलेले मी हाय कोळी हे नृत्य म्हणजे या कार्यक्रमाचा कळस ठरला. त्याचप्रमाणे शेतकरी गीत, आम्ही ठाकर, कैरी पाडाची ही इत्यादी नृत्यमय गीतांना रसिकांनी टाळ््यांचा व शिट्ट्यांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र कोंडे यांनी केले.

Web Title: Completed in the Shahiri Folk Art Festival 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.