ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरुद्ध मारहाणीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:23 PM2018-11-13T22:23:46+5:302018-11-13T22:29:44+5:30

तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक संजय पांडे यांच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याची घटना ताजी असतांनाच आता सेनेच्याच माजी नगरसेविका शांता सोलंकी यांच्या मुलाने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

Complaint against the son of former Shiv Sena corporator of Thane | ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरुद्ध मारहाणीची तक्रार

मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

googlenewsNext
ठळक मुद्देमारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैदठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलतिघांवर कारवाई

ठाणे : शिवसेनेच्या माजी नगरसेविका शांता सोलंकी यांचा मुलगा नरेश सोलंकी याने २० ते ३० साथीदारांना घेऊन सनी तांबे या तरुणाला लाकडी काठया आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने नरेश याच्यासह परस्परांविरुद्ध मंगळवारी सायंकाळी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील खारटन रोड परिसरात रविवारी रात्री सनी तांबे हा तरु ण उभा होता. त्यावेळी नरेश सोलंकी हा त्याच्या साथीदारांना घेऊन तिथे आला. त्याने अचानक सनी तांबे या तरु णाला लाकडी बांबु आणि काठयांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत सनीला दुखापत झाली आहे. मारहाणीच्या वेळी शांता सोलंकी या देखिल तिथे उभ्या होत्या, अशी चर्चा आहे. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. परस्पर विरोधी तक्र ार दाखल झाल्यानंतर यातील तिघांना अटक केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.
..................
हवेत गोळीबार
तीेन दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा निल पांडे याने आपल्या वाढिदवसानिमित्त हवेत गोळीबार केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. हा प्रकार लोणावळयातील असून ती खेळण्यातील एअर गन असल्याचे स्पष्टीकरण पांडे यांनी देऊन प्रकरणाची सारवासारव केली होती.

 


‘‘ नरेशने कोणालाही मारहाण किंवा साधा हात लावलेला नाही. उलट, सनीने किरण राठोड याला बेदम मारहाण केली. तेंव्हा सनीला मारहाण झाल्यावर नरेशने आणि मी मध्यस्थी करुन सोडविले.तर त्यांनी मारहाण केल्याचा आरोप लावला.’’
शांता सोलंकी, माजी नगरसेविका, शिवसेना
 

 

Web Title: Complaint against the son of former Shiv Sena corporator of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.