ठाण्यात तीन ठिकाणी क्लस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:18 AM2018-02-24T00:18:23+5:302018-02-24T00:18:23+5:30

ठाणे शहरात क्लस्टर योजना मंजूर झाल्यानंतर महापालिकेने तिच्या यशस्वीतेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यात अनेक अडथळे असले तरी पावसाळ्यापूर्वी किमान तीन क्लस्टर योजनांना मुहूर्त मिळावा

Cluster in three places in Thane | ठाण्यात तीन ठिकाणी क्लस्टर

ठाण्यात तीन ठिकाणी क्लस्टर

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहरात क्लस्टर योजना मंजूर झाल्यानंतर महापालिकेने तिच्या यशस्वीतेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यात अनेक अडथळे असले तरी पावसाळ्यापूर्वी किमान तीन क्लस्टर योजनांना मुहूर्त मिळावा, यासाठी पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. पहिल्या टप्प्यात लोकमान्यनगर, राबोडी आणि वागळे इस्टेट भागात या योजनांचा नारळ फोडला जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.
क्लस्टर योजनेसाठी विशेष महासभेची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली असली तरीदेखील या विषयावर सकारात्मक कारवाई सुरू असल्याने ही विशेष सभा बोलाविण्याची गरज नसल्याची भूमिका प्रशासनाने मांडली आहे. त्यातही काही दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठकही पार पडली आहे. त्यानुसार आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्यात वागळे, लोकमान्य आणि राबोडी मध्ये क्लस्टरचा मुहूर्त साधला जाणार आहे. याबाबतचे सर्व सोपास्कार करून येत्या पावसाळ्यापूर्वी तिचा नारळ वाढविला जाण्याची शक्यतादेखील पालिकेने व्यक्त केली आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू असून त्याला यश आल्यास खºया अर्थाने या अर्थाने क्लस्टरचा श्रीगणेशा ठाण्यात होणार आहे.शहरात आजघडीला पाच हजार ९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी आजमितीस नागरी पुनरूत्थान योजनेतंर्गत एकूण एक हजार २९१ हेक्टर जमिनीमध्ये ही योजना राबविण्याचे प्रस्तावित केले असून यात शहराच्या एकूण तुलनेत २२ टक्के इतकी जमीन क्लस्टर अंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. यामुळे शहरमामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये क्रीडा. सांस्कृतिक, सुरक्षितता दळणवळण, प्रत्येक समाजाची केंद्रे, महिला बचत गटांसाटी स्वतंत्र जागा त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व दैनंदिन गरजा पुरविणारे कम्युनिटी सेंटर आदी सुविधा निर्माण होणार आहेत.

क्लस्टर योजनेमुळे मुंबई सोडून उर्वरित एमएमआर क्षेत्रात ५१ टक्के रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे २३ हजार अतिरिक्त घरे निर्माण होणार असून परवडणाºया घरांच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. क्लस्टर योजनेमुळे जुन्या झालेल्या, धोकादायक अनाधिकृत इमारतींना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यांच्यासह शहरातील अनधिकृत इमारतींचाही क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करणे शक्य होणार आहे, असे पालिका अधिकाºयांचे म्हणणे आहे.

Web Title: Cluster in three places in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.