जमिनीच्या वादातून भाजपा आमदार मेहतांच्या बंगल्यावर राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 08:35 PM2019-06-17T20:35:45+5:302019-06-17T20:36:34+5:30

मेहतांना मारण्याची धमकी व कार्यालयाची तोडफोड

clash between two groups at BJP MLA narendra Mehta's bungalow | जमिनीच्या वादातून भाजपा आमदार मेहतांच्या बंगल्यावर राडा

जमिनीच्या वादातून भाजपा आमदार मेहतांच्या बंगल्यावर राडा

Next

मीरारोड - मीरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यात दोन गटात तुंबळ राडा झाला. धारदार शस्त्र व हॉकी सह लाथा बुक्कयांनी दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. मेहतांच्या कार्यालयात तोडफोड केली. आ. मेहतांना सोडणार नाही सांगत मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जखमी इसमासह आ. मेहतांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींवर चक्क दोन वेगळवेगळे गुन्हे नवघर पोलिसांनी दाखल केले आहेत. आमदाराच्या बंगल्यावर जमीनीच्या वादातून झालेल्या राड्याने खळबळ उडाली आहे.

आ. मेहतांचे स्वीय सहाय्यक असलेले दर्शन शर्मा यांनी नवघर पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार, गोल्डन नेस्ट मधील ब्लु मुन क्लब जवळ शगुन बंगला हे आ. मेहतांचे निवासस्थान आहे. रविवारी रात्री ८ च्या सुमारास भाजपाचे पदाधिकारी असलेले फिरोज शेख हे मनीष ओझा रा. दादर याला घेऊन आ. मेहतांना भेटण्यास आले होते. ओझाची कनकिया भागात जमीन असून ती अजय दुबे याने खरेदीच्या व्यवहारावरुन वाद होता. सदर वादामुळे फिरोज शेख यांनी ओझाला आ. मेहतांच्या बंगल्यावर नेले होते, असे सुत्रांनी सांगितले.

फिरोज बरोबर मेहतांच्या बंगल्यात बसलेला ओझा हा उठुन बाहेर गेला. बंगल्याच्या बाहेर थांबलेल्या अजय व अरुण दुबेंवर ओझासह त्याचा भाऊ, राजेंद्र बनसोडे, सागर जाधव, राकेश व अन्य साथीदारांनी हल्ला चढवला. हॉकी स्टीक व लाथा बुक्कायांनी बेदम मारहाण करतानाच अजयच्या पाठीवर धारदार शस्त्राने जखम करण्यात आली.

काही वेळातच बाहेरुन अजय व त्याचा भाऊ अरुण वाचवा वाचवा म्हणून ओरडत आत आले. त्यांच्या मागे ओझाही दुबे बंधूंना मारहाण करत बंगल्यात शिरले. त्यावेळी ओझा व साथीदारांनी मेहता कोभी छोडेंगे नही, किधर है आमदार असा आरडा ओरडा करत मेहतांच्या कार्यालयातील खुर्च्यांची फेकाफेक केली.

आरडा ओरडा ऐकुन आ. मेहतांंच्या पत्नी सुमन बाहेर आल्या आणी नवघर पोलिसांना बोलावण्यास सांगितले. दरम्यान सुरक्षा रक्षकां सह अन्य लोकं धावल्याने हल्लेखोर पळू लागले. बंगल्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले व आत अडकलेले हल्लेखोर बनसोडे व जाधव यांना पकडुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने नंतर परिसरात तणाव होऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या प्रकरणी जखमी अजयच्या तसेच आ. मेहतांचे सहाय्यक शर्मा यांच्या फिर्यादी वरुन मनीष ओझा सह साथीदारांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी बनसोडे व जाधवला अटक केली असुन ओझासह त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दुबे यांच्या फिर्यादी नुसार एका गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक थाटकर तर दर्शन यांच्या फिर्यादी नुसार दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक राठोड करत आहेत. कनकिया भागातील एक भुखंडाच्या व्यवहारातुन ओझा व दुबे यांच्यात वाद होता.

Web Title: clash between two groups at BJP MLA narendra Mehta's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.