रुग्णांच्या सोयीसाठी सिव्हील हॉस्पीटल मेण्टल हॉस्पीटलमध्ये हलवा, मनसे करणार आरोग्य सचिवांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 03:59 PM2019-01-17T15:59:48+5:302019-01-17T16:14:08+5:30

ठाणे : सिव्हील हॉस्पीटलच्या नुतनीकरणासाठी हे हॉस्पीटल तात्पुरते मुंब्रा - कौसा येथे हलविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुग्णांचे फक्त हाल होणार ...

Civil Hospital move temporarily to Mental Hospital: Avinash Jadhav | रुग्णांच्या सोयीसाठी सिव्हील हॉस्पीटल मेण्टल हॉस्पीटलमध्ये हलवा, मनसे करणार आरोग्य सचिवांकडे मागणी

रुग्णांच्या सोयीसाठी सिव्हील हॉस्पीटल मेण्टल हॉस्पीटलमध्ये हलवा, मनसे करणार आरोग्य सचिवांकडे मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देसिव्हील हॉस्पीटल तात्पुरत्या स्वरुपात मेण्टल हॉस्पीटलला हलवा : अविनाश जाधवटोरॅण्टेला मनसेचा विरोध : अविनाश जाधवशनिवारी महारक्तदान शिबीर

ठाणे : सिव्हील हॉस्पीटलच्या नुतनीकरणासाठी हे हॉस्पीटल तात्पुरते मुंब्रा - कौसा येथे हलविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुग्णांचे फक्त हाल होणार आहे. रुग्णांच्या सोयीसाठी हे हॉस्पीटल ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथे हलविण्यात यावे अशी मागणी राज्य आरोग्य सचिवांकडे केली जाणार असल्याची मनसेने गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
             शनिवारी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीराची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला राज्य आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे सिव्हील हॉस्पीटलच्या तात्पुरत्या स्थलांतराचा प्रश्न मांडला जाणार असल्याचे मनसे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले. सिव्हील हॉस्पीटलमध्ये ग्रामीण भागांतून रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांना ठाणे शहरात येण्याचा सोपा मार्ग आहे. सिव्हील हॉस्पीटल मुंब्रा - कौसाला स्थलांतरीत करुन ग्रामीण भागांतून येणाऱ्या रुग्णांचा प्रशासन ताप वाढवित आहेत. त्यामुळे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मोठी जागा आहे त्या ठिकाणी हे हॉस्पीटल स्थलांतरीत करण्यात यावे अशी आमची राज्य आरोग्य सचिवांकडे मागणी आहे आणि त्यांच्याशी महारक्तदान शिबीराच्या दिवशी चर्चा केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. रेल्वेसाठी चार एकर जागा लागणार असेल तर १६ एकर जागा का दिली जाणार आहे? तसेच, ही जागा रेल्वेला बांधू द्या, ठाणे महापालिका का बांधणार आहे? आमचे पैसे यासाठी का वाया घालविले जात आहेत? असे प्रश्न यावेळी करण्यात आले.
----------------------------------
टोरॅण्टेला मनसेचा विरोध : अविनाश जाधव
राज्य शासन टोरॅण्टो आणत आहे, त्याला आमचा विरोध आहे. कळवा - मुंब्रर्याला टोरॅण्टो झाले तर मनसे तमाशा करेल असा इशारा जाधव यांनी दिली. जे सत्तेत आहेत तीच शिवसेना - भाजपा या टोरॅण्टोला विरोध करीत आहेत, त्यांनी आपल्या मंत्र्यांजवळ हा विषय मांडावा, त्यांच्याशी चर्चा करावी, ज्यांनी टोरॅण्टो लादले तेच बंदचे नाटक करीत आहेत, मतदानापुर्वी सहानुभूती मिळवण्याचे नाटक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Civil Hospital move temporarily to Mental Hospital: Avinash Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.