सिडकोची भव्य गृहनिर्माण योजना, ठाणे मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:07 PM2018-12-17T17:07:37+5:302018-12-17T17:13:34+5:30

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटासाठी सदर गृहनिर्माण योजना ही तळोजा नोड्सह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकांच्या फोरकोर्ट एरियामध्ये प्रस्तावित आहे. नजीकच्या भविष्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईची भविष्यातील वाढ व त्या अनुषंगाने घरांची वाढती मागणी लक्षात घेता सदर गृहनिर्माण योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत.

CIDCO's grand housing scheme, Thane Metro will be held at the hands of Prime Minister, Bhumi Pujan | सिडकोची भव्य गृहनिर्माण योजना, ठाणे मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन

ठाणे –भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ व दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्ग ९ चे भूमिपूजन देखील पंतप्रधान करतील

Next
ठळक मुद्देसिडकोतर्फे बांधण्यात येणाऱ्या 89,771 घरांच्या भव्य गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ ठाणे –भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ व दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्ग ९ चे भूमिपूजन देखील पंतप्रधान करतीलदहिसर पूर्व ते मीरा भाईंदर असा १० किमीचा असून या मार्गात ८ एलिव्हेटेड स्थानके असतील.  यासाठी ६ हजार ६०७ कोटी रुपये खर्च अपेक्षित

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मंगळवार १८ तारखेस सिडकोतर्फे बांधण्यात येणाऱ्या 89,771 घरांच्या भव्य गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ होणार आहे. या योजनेस पंतप्रधान आवास योजनेंतर्गत  मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे ठाणे –भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग ५ व दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्ग ९ चे भूमिपूजन देखील पंतप्रधान करतील. कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर दुपारी २.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.   

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोने 89,771 घरांच्या भव्य गृहनिर्माण योजनेचा प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील तळोजासह अन्य नोड्मधील बस तसेच ट्रक टर्मिनलआणि रेल्वे स्थानकांजवळच्या परिसरात घरे बांधण्यात येतील. महागृहनिर्माण योजना- ऑगस्ट 2018 चा शुभारंभ करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरबांधणीसाठी ‘ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेन्ट’धोरणावर भर देण्याचे आवाहन केले होते.

नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये योजना राबविणार

या धोरणांतर्गत बस टर्मिनल वा रेल्वे स्थानक इ. परिवहन सुविधा असलेल्या परिसरात घरे व कार्यालये विकसित करून घर ते कामाचे ठिकाण यांतील अंतर कमी करून लोकांचा प्रवासाचा वेळ वाचवणे तसेच सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सिडकोतर्फे सदर गृहनिर्माण योजना नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. 

18,000 कोटीचा प्रकल्प

सदर गृहनिर्माण योजनेतील 89,771 घरांपैकी 53,493 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर 36,288 घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. सदर योजनेस पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लाभार्थी हे रु. 2.5 लक्ष तर अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी हे सीएलएसएस (Credit Linked Subsidy Scheme) अंतर्गत रु. 2.67 लक्ष अनुदानास पात्र असतील.

 सदर गृहनिर्माण प्रकल्पाकरिताचा अंदाजित खर्च रु. 18,000 कोटी इतका आहे. सिडकोच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा गृहनिर्माण प्रकल्प ठरणार आहे. रेल्वे स्थानकांतील फोरकोर्ट एरिया, ट्रक व आंतरराज्य बस टर्मिनल इमारतींवरील मोकळ्या जागा तसेच रेल्वे स्थानकां नजीकचे भूखंड यांचा वापर करून तेथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांकरिता घरे बांधावीत अशा प्रकारची नाविन्यपूर्ण कल्पना सिडकोतर्फे मांडण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटासाठी

सदर गृहनिर्माण योजना ही तळोजा नोड्सह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकांच्या फोरकोर्ट एरियामध्ये प्रस्तावित आहे. नजीकच्या भविष्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईची भविष्यातील वाढ व त्या अनुषंगाने घरांची वाढती मागणी लक्षात घेता सदर गृहनिर्माण योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत.

सिडकोतर्फे “सर्वांसाठी घरे” या उद्दिष्टांतर्गत महागृहनिर्माण योजना- ऑगस्ट 2018 राबविण्यात येऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांकरिता 14,838 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. 13 ऑगस्ट ,2018 रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात येऊन या योजने अंतर्गत ऑनलाईन सोडतीचा अवलंब करण्यात आला होता. या योजने अंतर्गत तळोजा, खारघर,कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी नोड्मधील 14,838 घरांपैकी 5,262 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर 9,576 घरे ही अल्प उत्पन्न गटातील यशस्वी अर्जदारांस वाटपित करण्यात आली.

लाभार्थ्य्यांची पारदर्शी निवड

सदर गृहनिर्माण योजनेकरिता लाभार्थ्य्यांची निवड करताना ती पूर्णत: पारदर्शक व सुलभ रितीने व्हावी याकरिता ऑनलाईन सोडत प्रक्रियेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ (lottery.cidcoindia.com) उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेतील कोणत्याही प्रकारचा शुल्क भरणा हा केवळ ऑनलाईन पेमेन्ट पद्धतीनेच करावा लागेल. सिडकोतर्फे अर्जदारांकरिता मोबाईल ॲपही तयार करण्यात आले आहे.  सिडकोतर्फे सदर योजनेतील घरे ही बांधकामास प्रारंभ केल्यानंतर वाटपित करण्याचे नियोजित आहे. यामुळे अर्जदारांना कमी दरात घरे उपलब्ध होण्याबरोबरच कर्जही कमी दरात उपलब्ध होईल व हफ्ता भरणेही सुलभ होईल. सदर योजना ही 3 वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणे प्रस्तावित आहे.

ठाणे मेट्रो मार्ग ५ आणि ९

ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे देखील भूमिपूजन करण्यात येणार आहे. एकंदर १७ एलिव्हेटेड स्थानके असणाऱ्या या मेट्रोची देखील या परिसरातील नागरिकांना प्रतीक्षा आहे. यासाठी भिवंडीतल्या कोनगाव येथे मेट्रो डेपो प्रस्तावित आहे. कल्याण कृषी बाजार समिती ते कापूरबावडी असा हा २४.५ किमीचा मार्ग आहे. यासाठी ८ हजार ४१७ कोटी खर्च अपेक्षित आहे.

मेट्रो ९ हा मार्ग दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर असा १० किमीचा असून या मार्गात ८ एलिव्हेटेड स्थानके असतील.  यासाठी ६ हजार ६०७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्ष २०२२ मध्ये तो पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

Web Title: CIDCO's grand housing scheme, Thane Metro will be held at the hands of Prime Minister, Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.