मुख्यमंत्र्यांची वाट खड्ड्यांतूनच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:36 AM2018-07-01T03:36:18+5:302018-07-01T03:36:55+5:30

कृषी दिनाचे औचित्य साधून रविवारी कल्याण तालुक्यातील वरपगाव येथे होणाऱ्या २२ हजार वृक्षांच्या लागवडीच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्तेविकास व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

 Chief Minister's way out of the pit? | मुख्यमंत्र्यांची वाट खड्ड्यांतूनच?

मुख्यमंत्र्यांची वाट खड्ड्यांतूनच?

Next

कल्याण : कृषी दिनाचे औचित्य साधून रविवारी कल्याण तालुक्यातील वरपगाव येथे होणाऱ्या २२ हजार वृक्षांच्या लागवडीच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्तेविकास व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. त्यांचा ताफा ठाणे-भिवंडी बायपासने कल्याणमध्ये येऊन वरपकडे रवाना होणार आहे. परंतु, या रस्त्यावरील कोनगाव येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांचे दणके बसून मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवू नये, म्हणून शनिवारी रात्रीपर्यंत युद्धपातळीवर ते बुजवण्याचे काम सुरू होते. मात्र, रात्रीच्या अंधारात ते कितपत बुजले जातात, याबाबत साशंकता आहे.
सध्या पावसाळ्यामुळे भिवंडी-कल्याण मार्गावरील कोनगाव येथील रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. मुख्यमंत्र्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर येथे शनिवारी खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. या कामामुळे कल्याण शहरात भिवंडीकडून येणारा मुख्य रस्ता, दुर्गाडी चौक ते आग्रा रोड, शिवाजी चौक, बैलबाजार, पत्रीपूल या भागांत मोठी कोंडी झाली होती. परिणामी, वाहनचालकांनी आपली वाहने अंतर्गत रस्त्याने वळवली. त्यामुळे मुख्य रस्त्यांना जोडणारे टिळक चौक, सहजानंद चौक, शंकरराव चौक, मोहम्मद अली चौक, संतोषीमाता मंदिर रोड हे देखील जॅम झाले. तेथे वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालक चांगलेच संतापले होते. दरम्यान, या कोंडीचा सामना वाहनचालकांना मध्यरात्री १२ पर्यंत करावा लागण्याची शक्यता वाहतूक विभागानेच व्यक्त केली.

आदिवासींना
न्याय मिळेल का?
टिटवाळा : वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि पाहुणचार वरप येथील राधास्वामी सत्संग येथे होणार आहे.
या सत्संगच्या राजेश लुल्ला यांनी येथील रहिवासी असलेल्या आदिवासी-कातकरी समाजाच्या हक्काच्या जमिनीवरील वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे, असे वरप येथील आदिवासींचे म्हणणे आहे.
वरप शेजारीलडोंगर टेकडीवर पाच ते सहा आदिवासी वाड्या आहेत. गेली अनेक पिढ्या ते गावात ये-जा करण्यासाठी तसेच अंबरनाथला जाण्यासाठी रस्ता वापरतात. परंतु, ही जागा राधास्वामी सत्संग यांनी खरेदी केली. त्यानंतर तेथे संरक्षण भिंत बांधण्याची परवानगी घेऊन धाकदपटशाने वहिवाट बंद केली.

कोनगाव हद्दीत खड्डे पडले आहेत. त्यामुळे कल्याण शहरात वाहतूककोंडी झाली आहे.
- संभाजी जाधव, पोलीस निरीक्षक (वाहतूक)

Web Title:  Chief Minister's way out of the pit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.