मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाडे टँकरमुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 06:40 PM2018-03-24T18:40:17+5:302018-03-24T18:40:17+5:30

‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले

 Chief Minister's decision, with 9 79 villages of Shahapur, 259 Padare tanker-free | मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाडे टँकरमुक्त 

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाडे टँकरमुक्त 

Next
ठळक मुद्दे भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षित‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरातजो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

 भावली धरणातील १२.६९ दलघमी. हक्काचे पाणी आरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ‘भावली धरण’ प्रकल्पातून शहापूर तालुक्यातील टँकरग्रस्त ९७ गावे २५९ पाड्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी सुमारे १२.६९ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या आदेशामुळे आता शहापूरच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यास यश मिळाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेवर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.
‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल्यामुळे भिमनवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारमानले. याचा लाभ शहापूरच्या माळ व दांड सारख्या दुर्गम भागातील गावांबरोबर वाशाळ, खर्र्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव अशा दोन लाख लोकवस्तीच्या गावेपाडे आदी ९७ गावे व २५९ आदिवासी पाड्यांना आता हक्काचे पाणी मिळणार आहे.
धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील काही गावे अनके वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी या तालुक्यातील नागरिकांच्या व्यथांची दाखल घेत भावली धरणातील पाणी जलसंपदा प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या तालुक्यातील गावपाड्यांची पाणी समस्या कायमची मिटणार आहे अशी माहिती भीमनवार यांनी दिली. शहापूर येथील कुणबी महोत्सवाला मुख्यमंत्री आले असता त्यावेळी पाण्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र भावना त्यांनी लक्षात घेत ‘गुरूत्वाकर्षण पद्धतीने भावली धरणाचे पाणी आणण्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.
जो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही, असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देणारा शासन निर्णय काढून शहापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील वारंवार आवाज उठवून पाटपुरावा केला असता त्यास यश मिळाले आहे.

Web Title:  Chief Minister's decision, with 9 79 villages of Shahapur, 259 Padare tanker-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.