ठाण्यातील विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, ट्रस्टचे अरविंद सुळे  उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:50 PM2018-03-13T16:50:59+5:302018-03-14T15:40:46+5:30

अनेक चेह:यांचा समुह म्हणजे समाज. समाजातील चेह:यांवर मुखवटे असणो अटळ. तरीही काही चेह:यांना वरदान असतं, मुखवटा रहित जगण्याचं. विश्वासाचं नातं जोडण्याचं - जोपासण्याचं. या नात्याचं यंदाचं 29 वे वर्ष साजरे झाले. 

The celebration day of the trust charitable trust in Thane is celebrated with enthusiasm | ठाण्यातील विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, ट्रस्टचे अरविंद सुळे  उपस्थित

ठाण्यातील विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, ट्रस्टचे अरविंद सुळे  उपस्थित

googlenewsNext
ठळक मुद्दे विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे अरविंद सुळे उपस्थितविविध गाण्यांवर गणेश वंदना सादर

ठाणे : आपल्या अंगातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळेतील विशेष मुलांनी उपस्थित रसिकांची दाद मिळवली . निमित्त होते विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा २९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे . रविवारी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या पी . सावळाराम सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्ह्यातील सोबती पॅरेण्ट असोसिएशनच्या अध्यक्षा उषा बाळ, विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे अरविंद सुळे  उपस्थित होते .
      या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्व्लन करून झाली . या निमित्ताने केंद्रातील काही मुलांनी विविध गाण्यांवर गणेश वंदना सादर करत गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले .त्यानंतर झालेल्या पालखी नृत्यात केंद्रातील विद्यार्थी पारंपरिक वेष परिधान करून सामील झाले होते . विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होऊन त्यांनी पालखी नृत्यातील पालखी नाचवणे , पालखी खेळवणे सारखे विविध प्रकार लीलया केल्याने उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला . या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रावर आधारित डॉक्युमेंट्री दाखवत संस्थेच्या कार्य , प्रगतीचा आढावा घेण्यात आला .  कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चुटकुले सादरीकरण , योगा प्रात्यक्षिके झाले .  कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात वार्षिक कामगिरीचा आढावा घेत केंद्रातील मुलांना सन्मानित करण्यात आले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास केंद्रातील मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंच्या स्टोल देखील मांडण्यात आला होता . या कार्यक्रमासाठी केंदातील मुलांचे पालक , हितचिंतक , स्नेही , ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमात विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले तर निवेदिका हर्षदा बोरकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन आपल्या ओघवत्या शैलीत केले .  

Web Title: The celebration day of the trust charitable trust in Thane is celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.