CDR case builder Sahu Delhi resident | सीडीआर प्रकरणाचा सूत्रधार साहू दिल्लीचा रहिवासी

ठाणे : कुणाच्याही मोबाइल नंबर्सचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून त्याची विक्री करणाºया खासगी गुप्तहेरांच्या टोळीचा सूत्रधार दिल्लीतील रहिवासी सौरव साहू असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाली आहे.
कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून तो १० ते १२ हजार रुपयांमध्ये विकण्याचे काम करणाºया चार खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी २४ जानेवारी रोजी अटक केली होती. वाशी येथील माकेश पांडियन, कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर, गिरगाव येथील जिगर विनोद मकवाना आणि ठाण्यातील समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल ही आरोपींची नावे आहेत. या आरोपींना सीडीआर पुरवण्याचे काम दिल्ली येथील सौरव साहू करत आहे़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.