परराज्यातील नामचिन गुंड होणार कॅमेराकैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:25 PM2019-06-08T23:25:01+5:302019-06-08T23:25:16+5:30

१२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच। १५ आॅगस्टला इंटिग्रेटेड डाटा सेंटर व कंट्रोल रूमचे उद्घाटन

Cameracades will be the nominally goons of the state | परराज्यातील नामचिन गुंड होणार कॅमेराकैद

परराज्यातील नामचिन गुंड होणार कॅमेराकैद

Next

ठाणे : चोरांवर वॉच ठेवण्यासाठी, गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत व्हावी तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन व नियंत्रण करणे सोपे जावे, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी शहराच्या विविध भागांत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्हीचे जाळे पसरले जात आहे. आतापर्यंत शहरात १२०० कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांसाठी इंटिग्रेटेड डाटा सेंटर व कमांड आणि कंट्रोल रूम सुविधा सज्ज होत असून त्याचे उद्घाटन येत्या १५ आॅगस्ट रोजी होणार आहे. या यंत्रणेमुळे एखादा वेश बदलून आलेला आरोपीसुद्धा या कॅमेºयांना फसवू शकणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मागील काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली. गुन्ह्यांची उकल जलदगतीने होण्यासाठी तसेच सुनसान परिसर, सर्व्हिस रोड आणि हायवेवर बसवण्यात आलेल्या कॅमेºयांची गुन्हेगारांवर नजर ठेवण्यास तसेच वाहतूक नियंत्रित करण्याकरिता चांगली मदत होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नगरसेवक निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ठाणे स्टेशन या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून ३९ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागांत तब्बल १२०० कॅमेरे बसवण्यात आले असून येत्या काळात आणखी ४०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. सुरुवातीला २ मेगापिक्सलचे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवण्यात आले असून ते चार मेगापिक्सलचे असल्याचे पालिकेने सांगितले. या कॅमेºयांचे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर हे हाजुरी येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले असून ते येत्या १५ आॅगस्ट रोजी पूर्णपणे कार्यरत होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून हाजुरी येथे उभारण्यात येत असलेल्या नियंत्रण कक्षासोबत डाटा सेंटरचीही निर्मिती सुरू आहे.

पोलीस कमांड कंट्रोल रूमचे आधुनिकीकरण
हाजुरी येथील कमांड कंट्रोल रूम सुरू झाल्यावर पालिका पोलिसांच्या कमांड कंट्रोल रूमचेही आधुनिकीकरण करणार असून त्यामुळे पालिका आणि पोलिसांचे एकाच वेळेस शहरात घडणाºया प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर लक्ष राहणार आहे.

नागरी सुविधाही जोडल्या जाणार
महापालिकेमार्फत ज्या काही सुविधा ठाणेकरांसाठी पुरवल्या जात आहेत, त्या सुविधांचे आधुनिकीकरण करून त्या सुविधा सध्या या यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ५० पैकी २० नागरी सुविधा या कमांड कंट्रोल रूमशी जोडल्या जाणार आहेत. त्यात शहरसुरक्षा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्थापन, कचरासंकलन, सांडपाणी, वाहतूक नियंत्रण, पथदिव्यांचे व्यवस्थापन अशा सुविधांचा समावेश आहे. या सुविधांमध्ये बिघाड झाल्यास नियंत्रण कक्षाला त्याची माहिती उपलब्ध होणार असून लागलीच या सुविधा पूर्ववत करण्यास मदत होणार आहे. अतिवृष्टी, आग लागणे, इमारत कोसळणे यासंबंधीची माहिती नियंत्रण कक्षाला कॅमेºयांच्या मदतीने तत्काळ कळणार असून यामुळे त्याठिकाणी मदतीसाठी यंत्रणा पाठवणे शक्य होणार आहे.
 

Web Title: Cameracades will be the nominally goons of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.