एनडीआरएफच्या टीमला पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:49 PM2019-02-01T22:49:13+5:302019-02-01T22:49:37+5:30

भूकंपाने डहाणू-तलासरी हादरली; शेकडो कुटुंबे भीतीने घराबाहेर

Call to NDRF team | एनडीआरएफच्या टीमला पाचारण

एनडीआरएफच्या टीमला पाचारण

Next

बोर्डी/तलासरी : डहाणू व तलासरी तालुक्यातील शेकडो घरांना भूकंपामुळे भेगा पडल्या असून धुंदलवाडी येथे भूकंपाच्या धक्यांनी घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे. तर ग्रामस्थ सुरक्षेकरिता घराबाहेर उघड्यावर राहत आहेत. दरम्यान त्यांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.

पहिला भूकंप १० किलोमीटर खोलीवर झाला तर दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा भूकंप ५ किलोमीटर खोलीवर होता. भीतीमुळे घराबाहेर राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना राहण्यासाठी एनडीआरएफ तंबू उभारण्याचं कार्य करणार आहे. तसेच, स्थानिक प्रशासनाच्यावतीनेही तंबू उभारून निवाºयाची सोय केली जाईल. शिवाय जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व विभागाच्या माध्यमातून सामूहिक काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिकांचा समावेश केला जाईल अशी माहिती डहाणू प्रांत अधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली.

सवणे गावातील लक्षी वाढीया, सीता मेढा, शिराड शेंदड, पार्वती टोकरे, तर शिसने मालपाडा येथील राजेश गडग, सुरेश वांगड, तर शिसने तलासरी सुतारपाडा येथील एका घराचा पडझडीमध्ये समावेश आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहेत.

कासा भागात संध्याकाळी ३.५७ वाजता मोठा धक्का
आज सकाळपासून डहाणू तालुक्यासह परिसराला भूकंपाचे ५ धक्के बसले असून, त्यातील कासा भागातील कासा, चारोटी, वरोती, महालक्ष्मी, धानिवरी भराड, ओसारविरा, आंबोली आदी गावात संध्याकाळी ३.५७ वाजता मोठा भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्याने घरातील भांडी, वस्तू, खिडक्या, तावदाने, पत्रे हलल्याची जाणीव झाली.

तीन महिन्यांतील सर्वाधिक तीव्र भूकंपाचा धक्का शुक्रवारी बसला. या भागात २४ कार्यक्र मांतून तीन हजार नागरिक आणि एक हजार विद्यार्थ्यांना भूकंप आल्यावर सुरक्षात्मक काळजी घेण्याचे प्रबोधन करण्यात आले आहे. नागरिकांकरिता तंबूही उभारण्यात आले आहेत. आज जिल्हाधिकाºयांनी भेट देऊन आढावा घेतला.
- राहुल सारंग,
(तहसीलदार, डहाणू)

या भागात चोवीस तास आरोग्य पथकाची नियुती केली असून दोन रु ग्णवाहिन्या पुरविण्यात आल्या आहेत.
- एच. भारक्षे (गटविकास अधिकारी,
डहाणू पंचायत समिती)
दिवसभर हे धक्के जाणवले, त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बºयाच घरांना तडे गेले असून भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
- वसंत सादडे (पोलीस पाटील, दापचारी)

दिवसभर बसणाºया भूकंपाच्या धक्क्याने गावात घबराट असून लोक घराबाहेर बसले आहेत, तसेच भगवान काकड गायकवाड यांच्या घराची भिंत कोसळली आहे.
- शिवा महाल, सरपंच (धुंदलवाडी ग्रामपंचायत)

Web Title: Call to NDRF team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.