ठाणे/डोंबिवली : नोटबंदी आणि त्यापाठोपाठ आलेल्या जीएसटीमुळे ठाण्यातील घरांचे दर काही अंशी का होईना वाढले असतानाही शनिवारी दस-याच्या मुहूर्तावर घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे. ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर परिसरातील ३५ घर खरेदीची प्रत्यक्ष नोंदणी झाल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले. त्याचवेळी दसºयाच्या पूर्वसंध्येला ८५६ तर प्रत्यक्ष दसºयाच्या मुहूर्तावर ३२६ दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. घर व वाहन खरेदीबाबत आश्वासक चित्र असताना सोने खरेदीत मात्र निम्म्याने घट झाल्याचे सराफ व्यापाºयांचे म्हणणे आहे.
दसºयाच्या मुहूर्तावर बिल्डरांकडून विविध आकर्षक योजनांची घोषणा केली गेली. प्रती चौरस फुटांच्या दरामध्ये कपात किंवा घर खरेदीवर वाहन, मोबाईल किंवा तत्सम वस्तुंची भेट देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. नोटाबंदीने अनेक बिल्डरांचे कंबरडे मोडले असताना जीएसटी लागू झाल्याने ते धास्तावले होते. त्यातच रेरा कायद्यानुसार नोंदणीपासून अनेक अटी लागू झाल्याने बिल्डर खासगीत नाराजी प्रकट करीत होते. ठाण्यातील घरांच्या दरात जीएसटीमुळे काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटीचा दर हा कमी करुन ७ टक्क्यापर्यंत आणावा, अशी मागणी ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी शासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे.
दसºयाच्या मुहुर्तावरही अनेकांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. नोटबंदी नंतर ठाण्यात गृह खरेदीचा प्रत्येक दिवशीच कल हा ५ ते १० फ्लॅट असा होता. परंतु आता बँकाचे व्याजदर स्थिर असल्याने आणि काही बँकांनी व्याज दरात कपात केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सुमारे २५० च्या आसपास घरांची विक्री झाल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात एक दिवसानंतर हा आकडा किती आहे, याचा अंदाज येऊ शकणार आहे.

घडणावळीवर सूट जाहीर करूनही निराशा
दरवर्षी दसºयाच्या मुहूर्तावर केल्या जाणाºया सोने खरेदीवर यंदा जीएसटीमुळे विपरीत परिणाम झाला असून खरेदी निम्म्याने घटल्याचे सराफा व्यापाºयांनी सांगितले. त्यातच आता ५० हजारांवरील व्यवहारांना केंद्र सरकारने चाप लावला असून त्यावरील व्यवहार करणाºया ग्राहकांचे ‘केवायसी’ आवश्यक केले आहेत. दिवाळीतही असेच वातावरण असल्यास या व्यवसायावर मंदीचे सावट येईल अशी भीती आॅल इंडीया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन असो.चे विभागीय संचालक, ठाण्याच्या चिंतामणी ज्वेलर्सचे संचालक नितीन कदम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
ते म्हणाले की, मार्चच्या तुलनेत चांदीत दोन हजारांची घट झाली आहे, पण तरीही मागणी मात्र नाही. गुढीपाडव्याला ग्राहकांनी परंपरेसाठी सोनं खरेदी करण्याचा उत्साह दाखवला. पण त्यानंतर सातत्याने बाजार गडगडत असल्याचे कदम म्हणाले. मार्चमधील इलेक्ट्रॉनिक पेमेंटला ग्राहकांची पसंती आता राहीली नसून कार्डपेमेंट कमी झाले आहे.
अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोन्यावरील दागिन्यांच्या घडणावळीत १५ ते २५ टक्के सूट, हिºयाच्या घडणावळीत ५० टक्के सूट जाहीर करुनही फारसा फरक पडला नाही, अशी तक्रार आहे. दसºयाच्या दिवशी सोन्याचे नाणे खरेदीवर अधिक भर असतो. यंदा मात्र नाणे खरेदीवर परिणाम झाला असल्याचे गणपत सावंत यांनी सांगितले.

पूर्वसंध्येलाच वाहन खरेदीचा उत्साह
दसºयाच्या शुभमुहूर्तावर ठाण्यात ३२६ वाहनांची नोंदणी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात झाली आहे. मात्र, दसºयापेक्षा त्याच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यात तब्बल ८५६ वाहनांची नोंदणी झाली आहे. या दोन्ही दिवसात ठाणेकरांनी सुमारे ८०० मोटारसायकल खरेदी केल्या आहेत. दसºयाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत वाहन खरेदी अपेक्षित असल्याने नोंदणीचा आकडा वाढण्याची शक्यता आरटीओने वर्तविली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने अद्ययावत ई-रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर विकसित केल्याने वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत थेट आॅनलाइन पद्धतीने होत आहे. ठाण्यात दुपारपर्यंत ३२६ वाहनांची नोंदणी झाली होती.
त्यामध्ये २५३ दुचाकी, ७५ इतर वाहनांचा समावेश आहे तर, दसºयाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात ८५६ वाहनांची नोंदणी झाली. त्यामध्ये ४१८ मोटार सायकल तर २१० चारचाकी तर उर्वरित इतर वाहने आहेत.

ठाणे शहर घर नोंदणी कार्यालयात दिवसभरात ३५ घर खरेदी व्यवहारांची नोंदणी झाली.
-अमोद यादव, नोंदणी उपमहानिरीक्षक, कोकण विभाग

सोने खरेदीकडे महिलांचाच कल अधिक होता. यात नेकलेस, अंगठी, कानातले या दागिन्यांना सर्वाधिक पसंती होती.लोकांनी सोने खरेदी केले पण जीएसटीमुळे त्याचे प्रमाण अत्यल्प होते. - कमलेश जैन

सध्या स्थिर असलेले घरांचे दर जीएसटीमुळे भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. - मुकेश सावला, एमसीएचआय

यंदा सोने खरेदीत मागच्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली. बहुतांश ग्राहक जीएसटी भरायला तयार होत नव्हते.
- कमलेश श्रीश्रीमल, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष